पोटात साचलेल्या अॅसिडमुळे अन्ननलिकेत जळजळ होते? मग नियमित खा 'हे' पदार्थ
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. शरीरात वाढलेल्या ऍसिडमुळे पोटात जळजळ होणे, उलट्या, मळमळ किंवा आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. याशिवाय आपल्यातील अनेकांना अॅसिड रिफ्लक्स ही समस्या उद्भवते. पोटात जमा झालेले ऍसिड अन्ननलिकेत म्हणजेच एसोफेगसमध्ये जमा होऊ लागते. हे ऍसिड जमा झाल्यानंतर वारंवार आंबट ढेकर येणे, सतत पित्त वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
‘हे’ पदार्थ घशातून खाली जाताच किडनीमध्ये तयार करतात मुतखडा, चुकूनही आहारात करू नका सेवन
शरीरात विषारी पदार्थ तसेच साचून राहिल्यामुळे सत्ता अपचनाची समस्या उद्भवू लागते. शरीरात वाढलेला ऍसिड छातीपर्यंत पोहचल्यानंतर अन्न किंवा पाणी पुन्हा तोंडात येणे, सतत खोकला येणे, आवाजात कर्कशपणा किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अन्ननलिकेत वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे जळजळ कमी होईल आणि तात्काळ आराम मिळेल.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी काहींना चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण सतत चहा कॉफीचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित पोटभर नाश्ता करावा. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते. त्यामुळे नाश्त्यात तुम्ही ओट्स आणि फळांचे सेवन केले जाते. ओट्समध्ये भरपूर फायबर असते. यामुळे शरीरात अॅसिडिटी वाढत नाही. छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी नाश्त्यात ओट्सचे सेवन करावे.
दही आल्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दह्यात असलेले प्रोबायोटिक्स शरीरात वाढलेली जळजळ कमी करतात. यासाठी वाटीभर दह्यात थोडस आलं किसून सेवन केल्यास छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. आल्यामध्ये असलेले गुणधर्म दाहक विरोधी गुणधर्म पोटाला आराम देतात.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. पालेभाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीर सुधारते. रोजच्या आहारात इतर कोणत्याही भाज्यांचे सेवन करण्याऐवजी पालेभाज्यांचे सेवन करावे. आहारात पालक, ब्रोकोली, काकडी, बीन्स इत्यादी हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील आणि पोटासंबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.