तणावामुळे वाढत आहेत मूड स्विंग्ज (फोटो सौजन्य - iStock)
तणावामुळे महिलांना चिंता आणि नैराश्यासारखे समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे वेळीच समजून घेतल्यास महिलांचे मासिक आरोग्य आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि मूड स्विंग्ज टाळण्यास मदत होऊ शकते. डॉ. श्वेता लालगुडी, स्त्रीरोग तज्ज्ञ, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल, मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
तणाव हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. तो व्यावसायिक किंवा वैयक्तिक समस्या, घटस्फोट, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, आर्थिक संकट किंवा अगदी कोणत्याही मानसिक आघातामुळे किंवा अपघातामुळे उद्भवू शकतो. वाढता ताणतणाव हा एखाद्या महिलेच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करू शकतो. तज्ज्ञांनी केलेल्या विविध अभ्यासांनुसार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही चिंता आणि नैराश्यासारख्या मूड डिसऑर्डरचा धोका असतो. हार्मोनल बदल, ठराविक जबाबदाऱ्या, सामाजिक दबाव आणि मल्टीटास्किंगमुळे (एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळणे) मूड डिसऑर्डर होण्याची शक्यता वाढते.
मानसिक तणाव असल्यास शरीर देतं हे 5 संकेत, चुकुनही करु नका दुर्लक्ष
तणाव आणि मूड डिसऑर्डरमधील संबंध
नक्की संबंध काय
तणाव मेंदू आणि शरीरावर अनेक प्रकारे परिणाम करतो. महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती संबंधित हार्मोनल चढउतार मेंदूवर येणाऱ्या तणावाला आणखी तीव्र करू शकतात. सामाजिक अपेक्षा अनेकदा महिलांना एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडण्यास भाग पाडते , जसे की घर आणि नोकरी सांभाळणे यामुळे एकाच वेळी अनेक भुमिका निभावताना तणावाचा सामना करावा लागू शकतो.
कालांतराने या वाढत्या ताणामुळे मानसिक थकवा, चिडचिडेपणा तसेच आपल्या आरोग्याकडे व आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करणे आणि सतत दुःख वाटु शकते, जी मूड डिसऑर्डरची लक्षणे आहेत. दीर्घकालीन ताणतणाव हे मूड नियंत्रित करण्यासाठी आवश्यक सेरोटोनिन आणि डोपामाइनची पातळी कमी करते. यामुळे एखाद्या व्यक्तीला चिडचिडेपणा, एकटेपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागू शकतो.
तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
तणाव कमी करण्यासाठी काय करावे
मानसिक तणाव जाणवतोय ? महिलांनो ! ‘या’ लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करु नका
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.