कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी
राज्यभरात सगळीकडे भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कारण रस्त्यावर आणि इतर ठिकाणी सतत फिरणारे कुत्रे अनेकांचे नुकसान करत आहेत. तसेच कारण नसताना रस्त्यावरून चालणाऱ्या किंवा खेळणाऱ्या मुलांना चावतात. कुत्रा चावल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कुत्रा चावल्यानंतर जर वेळीच लक्ष दिले नाहीतर रेबीज किंवा अनेक जीवघेणे आजार होण्याची शक्यता असते. कळत नकळत कुत्रा चावल्यानंतर कुत्र्याच्या लाळीमधील सर्व जंतू शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते. तसेच 28 सप्टेंबर ला जागतिक रेबीज दिवस असतो. तसेच यामुळे अनेक गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कुत्रा चावल्यानंतर रेबीज का होतो? रेबीजची होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कुत्रा चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी? याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
रस्त्यावर फिरणारे किंवा घरात पाळलेले पाळीव कुत्रे चावल्यानंतर किंवा त्यांची नख लागल्यानंतर अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते. कुत्र्याचे दात आणि नख लागल्यानंतर कुत्र्याच्या शरीरात असलेले जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात, जे आरोग्यसाठी घातक आहेत. यामुळे रेबीज होण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: विटामिन सी युक्त लिंबू पाण्याचे आहेत चमत्कारीत फायदे

कुत्रा चावू नये म्हणून कोणती काळजी घ्यावी
हे देखील वाचा: लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचे सेवन
कुत्रा चावल्यानंतर किंवा कुत्र्याची नख लागल्यानंतर सगळ्यात आधी जखमेवर डेटॉल किंवा इतर निर्जंतुनाशक लावावे. त्यानंतर जखम झालेल्या ठिकाणी कोणतेही मलम किंवा इतर गोष्टी लावून नये. थेट डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करून आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच कुत्रा चावून जखम झाल्यानंतर पाण्याने आधी जखम स्वच्छ करावी. नंतर डॉक्टरांकडे जाऊन मलम आणि उपचार घ्यावे.






