कडाक्याच्या थंडीत त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार! पपईच्या सालीचा वापर करून घरीच बनवा फेसपॅक
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त कोरडी होऊन जाते. हवेत वाढलेल्या गारव्याचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. त्यामुळे थंडीत त्वचेची जास्त काळजी घ्यावी. वाढत्या थंडीमुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा डिहायड्रेट झाल्यासारखी वाटते. त्वचेवर वाढलेला कोरडेपणा, पिंपल्स आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतात. पण तरीसुद्धा फारसा फरक दिसून येत नाही. या दिवसांमध्ये त्वचेसोबतच केसांच्या सुद्धा समस्या उद्भवू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे इत्यादी समस्या वाढू लागल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे न करता त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी पपईच्या सालीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपई शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. (फोटो सौजन्य – istock)
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना करत असतात. पण वारंवार केमिकल ट्रीटमेंट किंवा स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. त्वचेच्या समस्या वाढी लागल्यानंतर स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरून स्किन केअर किंवा फेसपॅक तयार करावा. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा खूप जास्त हायड्रेट दिसते. पपई खाल्ल्यानंतर पपईची साल काढून फेकून दिली जाते. मात्र साल फेकून न देता सालीपासून फेसपॅक तयार करावा.
पपईच्या सालींचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपईची साल काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून मध आणि कच्चे दूध, हळद, बेसन आणि गुलाब पाणी घालून व्यवस्थित पेस्ट मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कोणताही फेसपॅक लावल्यानंतर चेहऱ्यावर टोनर किंवा त्वचा हायड्रेट ठेवणाऱ्या क्रीम लावाव्यात. यामुळे त्वचा चमकदार आणि सुंदर राहते.
पपईच्या सालीचा फेसपॅक आठवड्यातून दोनदा त्वचेवर लावल्यास डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा चमकदार सुंदर दिसेल. थंडीच्या दिवसांमध्ये पपईची साल त्वचा हायड्रेट ठेवते. याशिवाय चेहऱ्यावर उन्हामुळे वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्स कमी करण्यास मदत करते. त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि मऊमुलायम ठेवण्यासाठी पपईचा वापर करावा. पपईमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.






