फोटो सौजन्य - Social Media
आपण अनेकदा लक्ष दिले असेल कि आपल्या गुडघ्यातून कटकट असा आवाज ऐकू येतो. मुळात, हा आवाज लोक फार हलक्यात घेतात. या आवाजाला बिलकुल हलक्यात घेऊ नका. कारण हे एका गंभीर आजाराचे लक्षण असते. या आजाराला ऑस्टिओआर्थरायटिस या नावाने ओळखले जाते. वाढत्या वयात होणारा हा आजार तरुणांमध्येही दिसून येत आहे. याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यात जास्त वजन असणे किंवा अनुवंशिकता कारणीभूत असते. कधी कधी अपघातामुळे हा आजार होण्याची शक्यता असते.
या परिस्थितीमध्ये सांध्यांतील कार्टिलेज खराब होते, ज्यामुळे सांध्यांमधून आवाज येऊ लागतो आणि पुढे तीव्र वेदना होऊ शकतात. या आजारात सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाहीत, परंतु सांध्यांमध्ये जकडणे, सूज, कमजोरी, आणि असह्य वेदना पुढील टप्प्यांमध्ये जाणवतात. गुडघ्यांमधून येणारा आवाज म्हणजे क्रेपिटस, जो कार्टिलेज खराब झाल्यावर हाडे एकमेकांवर घासल्याने होतो. सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, आर्थरायटिसचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. यामध्ये ऑस्टिओआर्थरायटिस, रूमेटॉइड आर्थरायटिस, सोरियाटिक आर्थरायटिस आणि गाउट हे प्रमुख आहेत.
सामान्यतः 50-60 वयोगटात हा आजार दिसून येतो, परंतु महिलांमध्ये 40-50 वयातही याचा प्रादुर्भाव होतो. खेळातील दुखापत किंवा अपघातामुळे, तसेच लठ्ठपणामुळे हा आजार लवकर होऊ शकतो. याच्या लक्षणांमध्ये हलकी किंवा तीव्र वेदना, सांध्यांमध्ये सूज येते. तसेच अनेकदा शारीरिक हालचाली केल्यावर वेदना वाढतात. जेव्हा हा आजार तीव्र होतो किंवा गंभीर टप्प्यावर पोहचतो त्यावेळी काम न करतानाही वेदना जाणवतात. कधी कधी तर हालचाल न केल्यानेही वेदना जाणवतात.
जर तुम्हाला असे काही त्रास जाणवत आहे किंवा तुमच्या ओळखीत कुणाला या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तर वेळीच खबरदारी घ्या. सांध्यामधून कटकट असा आवाज येऊ लागण्यास त्याकडे दुर्लक्ष तर मुळीच करू नका. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केल्यास हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. जीवनशैलीत बदल करून आणि वजन नियंत्रणात ठेवूनही हा धोका कमी करता येऊ शकतो. त्यामुळे सांध्यांमधून आवाज येत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. आपल्या खानपानावर नियंत्रण ठेवत चला. नियमित योग्य आणि पौष्टिक आहार ग्रहण करा तसेच व्यायाम करत चला.