जेवण बनवताना फॉलो केलेली 'ही' चूक शरीरासाठी ठरेल जीवघेणी, किडनी खराब होऊन येईल डायलिसिसची वेळ
शरीरातील सर्वच लहान मोठे अवयव कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. दीर्घकाळ निरोगी राहण्यसाठी शरीराच्या प्रत्येक अवयवावर काहींना काही जबाबदारी असते. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी रक्त शुद्ध करणे, शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकणे, शरीराचे कार्य निरोगी ठेवणे इत्यादी अनेक महत्वपूर्ण कामे करते. पण चुकीच्या सवयींमुळे किडनीचे आरोग्य बिघडते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी किडनीमध्ये तसेच साचून राहतात. ज्यामुळे किडनी खराब होणे, किडनी स्टोन किंवा किडनी कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. नियमित फॉलो केलेल्या छोट्या मोठ्या सवयी गंभीर आजाराचे कारण बनतात. तसेच आहारातील एक छोटी चूक किडनीचे आरोग्य पूर्णपणे खराब करून टाकते.(फोटो सौजन्य – istock)
‘तासातच मेलो असतो…’, मांस तुटून रक्तात मिसळत होतं, बोटं झाली कडक; Tilak Verma ला कोणता होता आजार?
किडनीसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात सुरुवातीला कोणतेच बदल दिसून येत नाहीत. मात्र हळूहळू किडनीच्या कार्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीचे आरोग्य बिघडवण्यास कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे दीर्घकाळ निरोगी आणि कायमच मजबूत राहण्यासाठी चुकीच्या सवयी फॉलो न करता योग्य सवयी फॉलो करून शरीराची काळजी घ्यावी.
पदार्थाची चव वाढवण्यासाठी सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. पण अतिप्रमाणात मीठ खाल्ल्यास किडनीवर जास्तीचा तणाव येतो, ज्यामुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे शरीरात पाणी तसेच साचून राहते. यामुळे ब्लडचा वॉल्यूम वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर तणाव येण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यांवरील ताण वाढल्यामुळे उच्च रक्तदाब वाढतो आणि मेंदूच्या आरोग्याला हानी पोहचते. सुरुवातीला किडनीमधील लहान रक्तवाहिन्या हा तणाव सहन करतात, मात्र कालांतराने हळूहळू किडनीमधील रक्तवाहिन्या खराब होऊन जातात.
किडनीचे मुख्य कार्य म्हणजे शरीरातील सोडियम आणि पोटॅशियम यांचे संतुलन राखणे. पण जेव्हा आपण आहारात खूप जास्त मिठाचे सेवन करतो, तेव्हा अतिरिक्त सोडियमला बाहेर टाकण्यासाठी किडनीला जास्त मेहनत घ्यावी लागते. यामुळे किडनीवरील भार वाढतो आणि किडनी लवकर खराब होते. किडनी फिल्टर करण्याची क्षमता कमी होऊन जाते.
जास्त मिठाचे सेवन केल्यामुळे लघवीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढते. हे कॅल्शियम किडनीमध्ये साचून राहते. कॅल्शियम किडनीमध्ये साचून राहिल्यानंतर हळूहळू खडे तयार होतात. बऱ्याचदा किडनीमध्ये साचून राहिलेल्या खड्यांमुळे असह्य वेदना होतात. किडनी खराब झाल्यानंतर लघवीमधून प्रोटीन बाहेर पडून जाते.
मूत्रपिंडाच्या नुकसानीची लक्षणे:
लघवीचे प्रमाण कमी होणे किंवा लघवीला त्रास होणे.सतत थकवा जाणवणे.पाय, बोटे किंवा डोळ्यांभोवती सूज येणे.
किडनी खराब होण्याची कारणे:
मधुमेह आणि उच्च रक्तदाब दोन आजारांचा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो. वेदनाशामक औषधांचा अतिवापर मूत्रपिंडाला हानी पोहोचवू शकतो.






