तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे शरीराला होणारे फायदे
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. थंड वातावरणामुळे सतत सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेकदा घरात गरम पाण्याची वाफ घेतली जाते. गरम पाण्याची वाफ घेतल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गरम पाण्याची वाफ घ्यावी. मात्र गरम पाण्याची वाफ घेताना त्यात तुरटी टाकल्यास आरोग्याला अनेक फायदे होतील. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. तुरटीच्या पाण्याने वाफ घेतल्यामुळे सर्दी, खोकला, त्वचारोग, आणि इतर लहान मोठ्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने लगेच गोळ्या औषध घेण्यापेक्षा घरगुती उपाय करून आराम मिळवावा. ज्यामुळे श्वसनाच्या सर्व समस्या दूर होतात. घशातील खवखव कमी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याची वाफ घ्यावी. कारण यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात श्वसनमार्गातील जीवाणू नष्ट करण्यासाठी मदत करतात आणि सर्दी, खोकला कमी होतो. आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित वाफ घेतल्यास श्वसनाच्या तक्रारी कमी होऊन आराम मिळेल.
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीच्या पाण्याची वाफ घ्यावी. तुरटीच्या पाण्यात असलेले गुणधर्म त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. चेहऱ्यावर आलेले मुरुम, ब्लॅकहेड्स आणि इतर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीच्या पाण्याची वाफ घ्यावी. याशिवाय तुरटीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या छिद्रांमधील घाण काढून त्वचा स्वच्छ करतात.ज्यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि तजेलदार दिसते.
तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे डोकेदुखीच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. याशिवाय शरीरात वाढलेला मानसिक तणाव कमी होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत होते. याशिवाय तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे झोपेची समस्या उद्भवत नाही.
लाइफ स्टाइलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
कानात होणारी जळजळ किंवा संसर्गापासून सुटका मिळवण्यासाठी तुरटीच्या पाण्याने वाफ घ्यावी. तुरटीच्या पाण्यात असलेले गुणधर्म कानाच्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. तसेच कानाच्या आतील भागातील जीवाणू नष्ट करून कान दुखीपासून सुटका मिळते. तुरटीच्या पाण्याची वाफ घेतल्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.