लग्नसराईत नववधूसाठी हटके उखाणे
तुळशी विवाहानंतर लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात होते. मराठमोळ्या पद्धतीने लग्न करताना पूर्वीच्या चालीरीती सुद्धा फॉलो केल्या जातात. लग्न सोहळा पार पडल्यानंतर नववधू आणि वराला उखाण्यांतून नाव घेण्यास सांगितले जाते. लग्नाच्या काही दिवस आधी उखाणा पाठ केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लग्नात नववधू आणि वराला सहज घेता येतील असे काही सोपे आणि मजेशीर उखाणे सांगणार आहोत. हे उखाणे ऐकून साऱ्यांचं आनंदाचे हसू येईल. लग्न सोहळा, पूजा, देवदर्शन इत्यादी अनेक ठिकणी उखाणे घेतले जातात.(फोटो सौजन्य – pinterest)
आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून,
___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून.
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
___रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
चाफा बोलेना, चाफा चालेना,
___च माझ्याशिवाय, पानच हलेना.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
___रावांचे नाव घेते___ची सून.
संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
___रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात___आणि___ची जोडी आहे जबरदस्त.
आकाशात रात्रीचे चमकतात, चंद्र आणि तारे,
___रावांसाठी, सोडून आले मी सारे.
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
___रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
___रावांचे नाव घेते, ईकडे द्या लक्ष.
नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
___रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
___रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.
मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार,
___रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार.
एक होती चिऊ आणि एक होता काऊ,
___च नाव घेतो, डोकं नका खाऊ.
ताजमहाल बनवायला, कारागीर होते कुशल,
___च नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल.
आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
___च नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.
प्रेमाच्या चौकात, किती पण फिरा,
शोधून नाही सापडणार, ___सारखा हिरा.
हिरव्यागार मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
___ला पाहून, पडली माझी विकेट.
सोन्याच्या कपावर, चांदीची बशी,
___समोर फिक्या पडतील, रंभा आणि उर्वशी.
फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
___च्या रूपाने, झालो मी बेभान.
आंब्याला आहे, फळांच्या राजाचा मान,
___चे नाव घेतो, ऐका देऊन कान.
चांदीच्या पैठणीला, सोन्याचा काठ,
___चं नाव घेतो, पुढचं नाही पाठ.
डाळीत डाळ, तुरीची डाळ,
___च्या मांडीवर खेळवीन, एक वर्षात बाळ.
उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ___च्या, गालावरचा तीळ.
खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला
मंदिरात वाहते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान
लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती
गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल
कपाळाचं कुंकू, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते नीट लक्ष ठेवा
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने
पंच पक्वान्नाच्या ताटात, वाढले लाडू पेढे,
… रावांचे नांव घेताना, कशाला आढे वेढे
मंदिराचे वैभव, परमेश्वराची मूर्ती,
… रावांचे नांव घेऊन करते इच्छापूर्ती
माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. राव आहेत सोबत, मग मला कशाचे उणे
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेताना, कसला आला आळस
पतिव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेताना, आशीर्वाद मागते
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सूत्रांचा हार
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी






