दैनंदिन आहारातील 'या' चमचमीत पदार्थांच्या सेवनामुळे वाढते युरिन इन्फेक्शन, नाजूक अवयवांची घ्या अशा पद्धतीने काळजी
युरीन इन्फेक्शन होण्याची कारणे?
नाजूक अवयवांची काळजी कशी घ्यावी?
कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे युरीन इन्फेक्शन वाढते?
रोजच्या आहारात विविध पदार्थांचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. तिखट, तेलकट, मसालेदार, चायनीज इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. भूक लागल्यानंतर घरातील पौष्टिक पदार्थांचे सेवन करण्याऐवजी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच चवीने खाल्ले पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात. सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे नाहीतर नाजूक अवयवांचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी. वाढत्या उन्हाळ्यात कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे लघवी करताना जळजळ, लघवी न होणे किंवा योनीमार्गात इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. काहीवेळा योनीमार्गात झालेल्या इन्फेक्शनमुळे किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांचे आरोग्य धोक्यात येते. चला तर जाणून घेऊया कोणत्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे युरीन इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा शरीरसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर महिला जास्त लक्ष देत नाहीत. सामान्य समस्या समजून त्याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता आरोग्याची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. डिहायड्रेशन, मूत्रमार्गात संसर्ग, पुरुषांमध्ये प्रोस्टेटची जळजळ, स्त्रियांमध्ये योनीमार्गाची जळजळ, लैंगिक संक्रमण, किडनी स्टोन किंवा अतितिखट तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे युरीन इन्फेक्शन वाढू लागते. खाण्यापिण्यात होणारे बदल युरीन इन्फेक्शन होण्यास कारणीभूत ठरतात. याशिवाय नाजूक अवयवांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे युरीन इन्फेक्शनचा धोका वाढतो.
अनेकांना रोजच्या आहारात कायमच दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करण्याची फार सवय असते. सतत आहारात पनीर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ मोठ्या आवडीने खाल्ले जातात. पण या पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरात फॉस्फरसचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. लघवीचा रंग बदलून जातो. तसेच अतिप्रमाणात दारू, सिगारेट किंवा इतर अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे युरीन इन्फेक्शन होते. लघवीचा रंग अतिशय गडद होतो आणि शरीराला हानी पोहचते.
प्रक्रिया केलेले पदार्थ, चिप्स, पॅकेज केलेले पदार्थ आणि मांस इत्यादी पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ असते. मीठ खाल्ल्यामुळे शरीरात सोडियमची पातळी झपाट्याने वाढू लागते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात मिठाचे सेवन करावे. जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि किडनीसंबंधित आजारांचा धोका वाढतो. सार्डिन, अँकोव्हीज आणि शेलफिश इत्यादी मासे खाल्ल्यास लघवीचा रंग बदलून जातो. माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरात युरिक ऍसिडची पातळी झपाट्याने वाढते आणि आरोग्य बिघडून जाते. लाल मांसचा आहारात अजिबात समावेश करू नये. यामुळे शरीराला अतिशय गंभीर आजारांची लागण होऊ शकते.
Ans: अपुरी स्वच्छता, कमी पाणी पिणे, लांब वेळ लघवी रोखून ठेवणे, संसर्गजन्य बॅक्टेरिया आणि काही वेळा जास्त मसालेदार/तेलकट पदार्थांचे सेवन ही प्रमुख कारणे आहेत.
Ans: लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवी लागणे, पोटाच्या खालच्या भागात वेदना, लघवीचा वास बदलणे किंवा रंग गडद होणे ही लक्षणे दिसतात.
Ans: महिलांची मूत्रमार्गाची लांबी कमी असल्यामुळे बॅक्टेरिया लवकर पोहोचतात, त्यामुळे त्यांना UTIचा धोका जास्त असतो.






