(फोटो सौजन्य: Ai Created)
प्रकल्पासाठी २०० टन प्रतिदिन क्षमेतचा निकष
कॉम्प्रेस्ड बॉयोगॅस प्रकल्पांसाठी किमान २०० टन प्रतिदिन क्षमतेचा निकष ठेवण्यात आला आहे. हे प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि उपक्रम, खासगी विकासक आणि तेल व वायू वितरण कंपन्यांमार्फत ग्रीनफिल्ड किंवा ब्राऊनफिल्ड स्वरूपात राबविता येतील, ज्या ठिकाणी पुरेसा कचरा उपलब्ध नाही तिये क्लस्टर-आधारित प्रकल्प तसेच कृषि उत्पादक संस्थाच्या मदतीने कृषितील टाकाऊ घटकांचे एकत्रिकरण करून प्रकल्प उभारण्याची तरतूद करण्यात आली आहे.
साताऱ्यात आयटी पार्क
राज्य मंत्रिमंडळाने सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे, औद्योगिक विकास महामंडळास ४२. ५५ हेक्टर जमीन देण्यात येईल. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार-व्यवसायाच्या संधी निर्माण होतील.
सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना दिलासा
उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन दिले जाणार आहे. या शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आगामी पदभरती प्रक्रियेमध्ये अतिरिक्त गुण दिले जातील.
जमिनीचे रूपांतर करण्याबाबतच्या अधिमुल्याची पुनर्रचना
राज्यातील जमीन धारणा मर्यादेच्या नियमानुसार, ‘भोगवटादार वर्ग-२’ मधून ‘भोगवटादार वर्ग – १’ मध्ये जमिनीचे रूपांतर करण्याबाबतच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. अधिसूचना लवकरच निर्गमित करण्यास मान्यता दिली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






