"भारत म्हणजे नरक!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने खळबळ; भारतीयांच्या 'नोकऱ्यां'वरही केली विषारी टीका, नेमकं काय घडलं? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump fires Navy Chief John Phelan : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी पुन्हा एकदा आपल्या एका सोशल मीडिया पोस्टने भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ट्रम्प यांनी थेट भारताला ‘नरक’ (Hellhole) संबोधणारा आणि भारतीयांच्या अमेरिकेतील नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा एक वादग्रस्त व्हिडिओ शेअर केला आहे. लेखक मायकल सॅव्हेज यांच्या या व्हिडिओला ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याने केवळ राजनैतिकच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही मोठा वाद निर्माण झाला आहे.
मायकल सॅव्हेज यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये अत्यंत खालच्या थराची भाषा वापरत भारत आणि चीनसारख्या देशांना ‘नरक’ म्हटले आहे. ट्रम्प यांनी हा व्हिडिओ केवळ शेअरच केला नाही, तर त्यातील मजकूर चार पानांच्या पोस्टमध्ये लिहून त्याला एक प्रकारे आपली अधिकृत संमती दिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. “भारत किंवा चीनसारख्या ग्रहावरील कोणत्याही ‘नरकातून’ (Hellhole) लोक अमेरिकेत येतात आणि इथली व्यवस्था बिघडवतात,” असे विधान या व्हिडिओत करण्यात आले आहे. या विधानामुळे जगभरातील भारतीयांनी ट्रम्प यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Press Freedom : कर्तव्य बजावताना मृत्यूला कवटाळलं! पत्रकार अमल खलील इस्रायली हल्ल्यात ठार; लेबनॉन पेटून उठलं
ट्रम्प यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियातील तंत्रज्ञान (Tech) क्षेत्रात आता भारतीयांचेच वर्चस्व असून, तिथे “गोऱ्या माणसांना (White Men) नोकरीसाठी अर्ज करण्याची गरज उरलेली नाही,” अशी विषारी टीका करण्यात आली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील भरती प्रक्रिया भारतीय आणि चिनी लोकांच्या हातात असल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. याशिवाय, अमेरिकेच्या १४ व्या घटनादुरुस्तीनुसार मिळणाऱ्या ‘जन्मसिद्ध नागरिकत्वा’च्या (Birthright Citizenship) अधिकारावरही ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रहार केला आहे. एखादे बाळ अमेरिकेत जन्मले की त्याला लगेच नागरिकत्व मिळते आणि त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला भारतातून अमेरिकेत बोलावतात, ही पद्धत चुकीची असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
❗️ट्रंप ने भारत और चीन को ‘नरक’ बताते हुए डेमोग्राफिक टेकओवर का दावा करने वाला लेटर रिपोस्ट किया अमेरिकी राष्ट्रपति ने एक पत्र को फिर से शेयर किया है, जिसमें भारत और चीन को लेकर बेहद आपत्तिजनक टिप्पणी की गई है और “डेमोग्राफिक टेकओवर” का दावा किया गया है। पत्र में कहा गया है कि… pic.twitter.com/X0SV9PsE9I — RT Hindi (@RT_hindi_) April 23, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांनी ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी यापूर्वी भारतातील भारतीयांचा मोठा समर्थक होतो, पण आता इथल्या (अमेरिकेतील) परिस्थितीबद्दल माझे डोळे उघडले आहेत.” ट्रम्प यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे अमेरिकेतील स्थलांतरित भारतीय आणि भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेषतः सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांना आता या विधानाचे काय परिणाम होतील, याची भीती वाटू लागली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Protect Bangladesh Hindus : बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याचा ‘बळी’? झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ
हा वाद केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून, भारत आणि अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही याचे सावट पडू शकते. ट्रम्प यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींसोबतची आपली मैत्री अनेकदा मिरवली आहे, मात्र आता थेट देशालाच ‘नरक’ संबोधल्याने भारत सरकार यावर काय अधिकृत प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी घेतलेली ही टोकाची भूमिका भारतीयांना अमेरिकेपासून दूर नेणारी ठरू शकते.
Ans: ट्रम्प यांनी मायकल सॅव्हेज यांचा व्हिडिओ शेअर करत भारताला आणि चीनला 'नरक' (Hellhole) असे संबोधले आहे.
Ans: अमेरिकेच्या आयटी आणि टेक क्षेत्रातील भरती प्रक्रिया भारतीय आणि चिनी लोकांनी हायजॅक केली असून तिथे स्थानिकांना संधी दिली जात नाही, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
Ans: ट्रम्प हे जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या अधिकाराचे कट्टर विरोधक असून, ही पद्धत अमेरिकेच्या हिताची नाही, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.






