अप्पर लिप्स करताना या घरगुती पदार्थांचा करा वापर
शरीरावर असलेले अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडींग-वॅक्सिंग केले जाते. महिला दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन अंडरआर्म्स, अप्पर लिप्स, हातापायांवरील केसांचे वॅक्सिंग करून घेतात. मात्र अनेकदा वॅक्सिंग करताना त्वचेसंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. वॅक्सिंग करताना किंवा थ्रेडींग करताना चेहऱ्यावरील त्वचा खेचली जाते, ज्यामुळे त्वचा फाटणे किंवा त्वचेवर रॅशेस येऊ लागतात. या भीतीमुळे अनेक महिला वॅक्सिंग आणि थ्रेडींग करणे टाळतात.(फोटो सौजन्य – iStock)
ओठांवर असलेले केस काढण्याची महिला खूप जास्त भीती वाटते, कारण चेहऱ्यावरील त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे वॅक्सिंग किंवा थ्रेडींग करताना त्वचेला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी अप्पर लिप्सवरील केस काढण्यासाठी सोपा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यामुळे अप्पर लिप्स करताना कोणतीही इजा होणार नाही.
घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नाही. यासाठी बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात दूध मिक्स करुज जाडसर पेस्ट तयार करा. जाडसर पेस्ट तयार केल्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट हळूहळू ओठांवर लावून हलक्या हाताने मसाज करा. २ ते ३ मिनिटं हलक्या हाताने मसाज केल्यामुळे अप्पर लिप्सवरील केस सहज निघतील. ओठांवर हलक्या हाताने स्क्रब केल्यामुळे अप्पर लिप्सवर वाढलेले केस कमी होतील. याशिवाय हा उपाय करताना कोणतीही वेदना होणार नाही. बेसन आणि दूध त्वचा उजळदार आणि फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते.
मध आणि साखरेचा वापर करून तुम्ही अप्पर लिप्स करू शकता. यासाठी वाटीमध्ये मध घेऊन त्यात साखर मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण अप्पर लिप्सवर लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे ओठांवरील केस निघून येतील. मधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा उजळदार करण्यासाठी मदत करतात. याशिवाय ओठांवर आलेले अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करण्याऐवजी घरगुती उपाय करावे. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर करावा.