सूर्यदेवताला नमस्कार करते मंदिर
पाण्यावरचं आलिशान स्वप्न! भारतात ‘या’ ठिकाणी घेता येईल हाऊसबोट्सचा अविस्मरणीय अनुभव
आज आपण सूर्यदेवांना अर्पित अशाच एका विलक्षण मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याबाबत असे सांगितले जाते की सूर्यकिरणांच्या प्रभावामुळे हे मंदिर आपोआप झुकत असल्यासारखे भासते. देवभूमी उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात सूर्यदेवांना समर्पित एक भव्य आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी मजबूत ग्रॅनाइट दगडांचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या गर्भगृहात सूर्यदेवांची मूर्ती विराजमान असून, मंदिर परिसरात भगवान शिव, माता पार्वती, देवी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचीही पूजा केली जाते.
या मंदिराबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याची रचना. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, मंदिराकडे बाहेरून पाहिले असता ते पूर्व दिशेकडे झुकलेले असल्यासारखे दिसते. पुराणकथांनुसार, या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात झाली होती. सुरुवातीच्या काळात हे मंदिर पूर्णपणे सरळ होते, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते हळूहळू पूर्व दिशेकडे झुकत असल्याचा अनुभव गावकऱ्यांना येत आहे. या घटनेमुळे शास्त्रज्ञही संभ्रमात पडले आहेत. मंदिराच्या या रहस्याचा उलगडा करण्यासाठी पुरातत्व विभागानेही संशोधन केले होते, मात्र ठोस वैज्ञानिक कारण शोधण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे आजही हे रहस्य कायम आहे.
बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
गावकऱ्यांचा दृढ विश्वास आहे की हा सूर्यदेवांचा चमत्कार आहे. त्यांच्या मते, दररोज सकाळी उगवत्या सूर्याला हे मंदिर नम्रपणे वाकून अभिवादन करत असल्यासारखे भासते. म्हणूनच हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर आपल्या अद्भुत रहस्यामुळेही भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.






