(फोटो सौजन्य: istock)
बॉलिवूड स्टार्सची पसंती; थंड हवा, धबधबे आणि स्ट्रॉबेरी… हिवाळ्यात खास ठरते महाबळेश्वरची सफर
केरळ :
केरळमधील बॉकवॉटर हे हाऊसबोट्ससाठी जगप्रसिद्ध आहे. शांत निळे पाणी, दोन्ही बाजुंनी पसरलेली हिरवीगार भातशेती आणि नारळाची झाडे हे दृश्य मन मोहून टाकणारे असते. केरळमधील हाऊसबोटमध्ये राहून तुम्ही निसर्गाच्या अगदी जवळचा अनुभव घेऊ शकता.
गोवा :
गोव्यातील चापोरा नदीवर असलेल्या हाऊसबोट्समधून सूर्यास्ताची सुंदर दृश्ये पाहता येतात. तसेच रात्री गोव्याची प्रसिद्ध नाईटलाईफ अनुभवण्याची संधीही
येते मिळते. आराम, रोमांच आणि मजा यांचा परिपूर्ण संगम म्हणजे गोव्याचे हाऊस बोट्स.
श्रीनगर :
श्रीनगरमधील दाल सरोवरावरील तरंगणाऱ्या हाऊसबोट्स हा पर्यटकांसाठी खास आकर्षणाचा विषय आहे. शांत सरोवर, भोवतालचा हिमालयाचा नयनरम्य नजारा आणि आल्हाददायक वातावरण यामुळे येथे राहण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो.
हाऊसबोट्समधील सुविधा
हाऊसबोट्समध्ये आधुनिक खोल्या, स्वच्छ स्नानगृहे आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे पाण्यावर राहूनही कोणतीही असुविधा जाणवत नाही. एक अद्भुत सांस्कृतिक अनुभव हाऊसबोटवर स्थानिक खाद्यपदार्थ, पारंपरिक कला आणि संगीताचा आनंद घेता येतो. यामुळे पर्यटकांना भारतीय संस्कृतीचा वेगळ्या पद्धतीने अनुभव घेण्याची संधी मिळते.
कोणासोबत जायचे?
फॅमिली, मित्र किंवा तुमच्या पार्टनरसह हाऊसबोटवर सुट्टी घालवणे हा एक उत्तम पर्याय आहे. शांत वातावरणात वेळ घालवत आठवणींना उजाळा देण्यासाठी हा अनुभव नक्कीच खास ठरेल.
पर्यटन आणि बुकिंग:
आजकाल हाऊसबोट्ससाठी ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






