तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरेल आरोग्यासाठी अतिशय घातक?
चुकीची जीवनशैली, कामाचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, आहारात सतत होणारा बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा तांब्याच्या भांडीतील पाणी पिण्याचा सल्ला देतात. तांब्याच्या भांड्यातील गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. याशिवाय रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास शरीरातील तांब्याची कमतरता भरून निघते, पचन सुधारते, चयापचय वाढते, वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. नियमित सकाळी उठल्यानंतर अर्धा ग्लास किंवा एक ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पोट आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – iStock)
तांब्याच्या भांड्यात पाणी शरीरासाठी जितके चांगले आहे तिकतेचं वाईट सुद्धा आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर अनेकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय असते. पण अर्धा किंवा एक ग्लासापेक्षा जास्त तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.
तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिशय प्रभावी ठरते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि निरोगी राहते. त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. उच्च रक्तदाबाच्या समस्येनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तांब्याच्या भांड्याचे पाणी प्यावे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिप्रमाणात पिऊ नये. अर्धा किंवा एक ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ नये. यामुळे तांब्याची भांडी खराब होण्यासोबत अनेकांना तीव्र पोट दुखीचा त्रास होऊ लागतो. दिवसभरात सतत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील झिंक नष्ट होऊन जाते. याशिवाय यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
जास्त प्रमाणात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोटात जळजळ वाढण्याची शक्यता असते. तर काहींना उलट्या किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-माइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटी-ऑक्सिडंट इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात.