लहान मुलांसाठी सर्वाेत्तम पाण्याची बाटली कोणती?
केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
डाॅक्टरांचा सल्ला
डाॅक्टरांच्या मते, लहान मुलांसाठी बाटलीची किंंमत आणि त्याचे डिजाईन पाहून बाटलीची निवड करु नये. बाटली निवडताना आरोग्यासाठी ती सुरक्षित आहे की नाही हे देखील तपासायला हवे. लहान मुलांसाठी योग्य जेवण निवडण्याइतकेच योग्य बाटली निवडणेही महत्त्वाचे ठरते.
कोणती बाॅटल आहे सर्वात सुरक्षित?
डाॅक्टर रवि मलिकच्या मते, लहान मुलांसाठी स्टीलची बाटली सर्वात उत्तम पर्याय ठरतो. स्टीलची बाटली मजबूत असते ज्यामुळे ती लवकर तुटत नाही. लहान मुलाने शाळेत खेळताना आपली बाटली आपटली किंवा त्याच्याकडून खाली पडली तरी बाटली तुटण्याचा धोका यात नसतो. बाटलीत पाणी भरताना फक्त ती योग्य प्रकारे पाण्याने आणि साबणाने स्वच्छ करावी. स्टीलच्या बाटलीत घाण लवकर जमा होत नाही. जर तुम्ही रोज शाळेत जाणाऱ्या मुलासाठी बाटली शोधत असाल तर स्टीलची बाटली तुमच्यासाठी योग्य ठरेल.
कोचेची बाटली
जर मुलगा थोडा मोठा असेल आणि आपल्या वस्तूंची नीट काळजी घ्यायला त्याला जमत असेल तर काचेची बाटली त्याच्यासाठी परफेक्ट ठरेल. काचेच्या बाटलीत कोणत्याही प्रकारचे केमिकल नसते आणि यामध्ये पाण्याची चव देखील बदलत नाही. काचेच्या बाटलीला स्वच्छ करणे देखील सोपे आहे. परंतु यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे बाटलीला योग्य रितीने हाताळणे. बाटली हातातून सटकताच काच फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे याला काळजीपूर्वक हाताळावे.
तांब्याची बाटली
आजकाल अनेकजण तांब्याची बाटली वापरतात. पूर्वीच्या काळापासून तांब्याचा वापर केला जात आहे. परंतु मुलांसाठी याचा योग्य रितीने वापर करणे फार महत्त्वाचे ठरते. डाॅक्टरांच्या मते, तांब्याच्या बाटलीत जर खूप गरम पाणी ठेवले किंवा यात लिंबू सरबत अथवा कोणते फ्रुट ज्यूस ठेवले गेले तर त्यात तांब्याचे काही कण मिसळले जाऊ शकतात. यामुळे पोटदुखी, उलट्या आणि अन्य समस्यांना खुले आमंत्रण मिळते.
वापरलेल्या Aluminium Foil च्या मदतीने झाडांना मिळेल पोषण, ४ सोप्या पद्धती जाणून घ्या
प्लॅस्टिक बाॅटल
प्लॅस्टिक बाटली हलकी असते. परंतु लहान मुलांना सहसा ही बाॅटल वापरण्यास न देण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. जर प्लॅस्टिकची बाॅटल तीव्र उष्णात किंवा गरम जागी ठेवली तर त्यातील BPA सारखे केमिकल पाण्यात मिसळून जातात. असे केमिकल शरीरातील हार्मोन्सवर वाईट परिणाम करु शकतात. यामुळे पुढे जाऊन लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते.






