शिलाजीत कुठे आणि कसे मिळते
शिलाजित हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात गैससमज निर्माण होता आणि अनेकांना वाटते की पुरुषांचा स्टॅमिना वाढविण्यासाठीच शिलाजीतचा वापर करण्यात येतो. अनेकांच्या मनात शक्तीची भावना निर्माण होते. तर शिलाजीतला उर्जेचा खजिना म्हणून देखील ओळखले जाते.
पर्वतांमध्ये आढळणारे शिलाजित हे पुरुषांच्या आरोग्यासाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते, म्हणूनच त्याचा व्यवसाय सतत वाढत आहे. खरे शिलाजित हे मर्यादित प्रमाणात उपलब्ध असताना, बनावट शिलाजितदेखील मोठ्या प्रमाणात विकले जाते आणि अनेक लोकांनी ते उत्पन्नाचे स्रोत बनवले आहे. आज, आम्ही तुम्हाला शिलाजित कुठून येते आणि त्याची खरी ओळख काय आहे याबाबत माहिती देणार आहोत.
शिलाजित म्हणजे काय?
शिलाजीतला ‘पर्वतांचा घाम’ असेही म्हणतात. हा एक चिकट पदार्थ आहे जो पर्वतांमध्ये झिरपतो, जो हिमालयासारख्या पर्वतीय प्रदेशात वनस्पती आणि सेंद्रिय पदार्थांच्या दीर्घकाळ विघटनानंतर तयार होतो. शिलाजीत हा गडद काळा रंगाचा पदार्थ असतो आणि फुलविक अॅसिड, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो. म्हणूनच आयुर्वेदात कमकुवतपणावर मात करण्यासाठी हा एक शक्तिशाली उपाय मानला जातो. ते टेस्टोस्टेरॉनची पातळी वेगाने वाढवते.
शिलाजित कुठे मिळते?
आता, लोकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुरूषांचा स्टॅमिना वाढविणारा हा खजिना कुठून येतो? भारतातील हिमालयीन प्रदेशात शिलाजित मुबलक प्रमाणात आढळते, जिथे लोक दरवर्षी पर्वतांमधून ते काढतात. ते कसे ओळखायचे हे सर्वांनाच माहीत नसते; ते खडकांमधून काढले जाते. शिलाजित नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीनच्या पर्वतीय प्रदेशातदेखील आढळते. आजही, अनेक ग्रामीण भागात ते रोजगाराचे एक प्रमुख साधन आहे.
शिलाजित कसे काढले जाते?
शिलाजित काढण्यासाठी, लोक उंच कड्यांवर चढून तेथे असलेले शिलाजितचे काळे दगड ओळखून आपला जीव धोक्यात घालतात. या दगडांमधील भेगांमध्ये शिलाजित आढळते. याचे तुकडे तोडले जातात, घरी आणले जातात आणि नंतर बराच काळ उकळले जातात. त्यानंतर, शिलाजित चाळून वेगळे केले जाते. नंतर ते पुन्हा उकळले जाते जोपर्यंत सुरुवातीला उकळताना वापरलेले पाणी बाष्पीभवन होत नाही तोपर्यंत त्यावर प्रक्रिया करण्यात येते. नंतर ते जाड काळा पदार्थ बनते, जे नंतर थंड करून पॅक करण्यात येते. खऱ्या शिलाजितची चव कडू असते, ते तुम्ही नुसते खाऊ शकत नाही.
आयुर्वेदिक औषधी वनस्पती उत्तम आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त
शिलाजीत कसे खावे?
या विषयावर अधिक माहिती रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलमधील आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी दिली. डॉ. श्रेय यांच्या मते, शिलाजित हे पुरुषांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. जर तुम्ही पुरुष असाल आणि तुमची शारीरिक क्षमता कमी असेल तर तुम्ही शिलाजितचे सेवन करू शकता. पुरुषांसाठी शिलाजित घेण्याची योग्य वेळ रात्रीची मानली जाते.
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही शिलाजित दुधात मिसळून पिऊ शकता. या पद्धतीमुळे शरीराला शिलाजितचे फायदे सहजपणाने मिळतात. जर तुम्हाला मूत्रसंस्थेशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच शिलाजितचे सेवन करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.