एप्रिलफूल का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्व?
April Fools’ Day 2025 : उद्यापासून एप्रिल महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सगळीकडे एप्रिलफूल साजरा केला जातो. अनेक लोक या दिवशी घरातील सदस्यांना, नातेवाईकांना किंवा इतर मित्रमंडळींना विनोदी मेसेज करत काहींना काही पाठवत असतात. एकमेकांशी विनोद करण्याव्यतिरिक्त एकमेकांना ते विनोद सांगितले सुद्धा जातात. मात्र सगळीकडे हा दिवस साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी सगळीकडे हा दिवस साजरा केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे एप्रिलफूलची सुरुवात नेमकी कशी झाली? एप्रिलफूल का साजरा केला जातो? याबद्दल आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
पायांचे घोटे काळेकुट झाले आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय करून पाय करा स्वच्छ, काळे झालेले पाय होतील सुंदर
एप्रिल फूल साजरा करण्यामागे अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. तसेच एप्रिलफूलची सुरुवात ‘कँटरबरी टेल्स’ मधील ‘द नन्स प्रिस्ट्स टेल’ नावाच्या कथेने सुरुवात झाली होती. 1381 मध्ये सुरू झालेला हा दिवस अजूनही सगळीकडे दरवर्षी साजरा केला जातो. इंग्लंडचे राजा रिचर्ड दुसरे आणि बोहेमियाची राणी अँ यांच्या साखरपुड्याची घोषणा करण्यात आली होती. तारीख घोषित झाल्यानंतर त्याच्या आणि राणी अँच्या लग्नाची तारीख ३२ मार्च ठरवण्यात आली होती.
मात्र तिथे असलेल्या लोकांना राजांनी सांगितलेल्या कोणत्याच गोष्टी समजल्या देखील नाहीत आणि त्यांनी विश्वास सुद्धा ठेवला नाही. राजाच्या लग्नाची तारीख ठरल्यानंतर सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. मात्र अचानक त्यांच्या लक्षात आले की 32 मार्च अशी कोणतीच तारीख नाही त्यांना फसवण्यात आले आहे. त्या दिवसापासून सगळीकडे एप्रिलफूल साजरा केला जाऊ लागला.
एप्रिलफूल साजरा करताना सर्वच लोक एकमेकांसोबत विनोदी संवाद साधतात. याशिवाय या दिवशी लोक खोड्या देखील करतात. कोणत्याही खोट्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीतरी इतका मजेदार खोटारडेपणा करतो की समोरचा माणूस हसत हसत जमिनीवर कोसळून जातो.याशिवाय अनेक लोक घरातील व्यक्तींची मस्करी करतात.
अंड खाल्यामुळे वाढतो खराब कोलेस्ट्रॉलचा धोका! जाणून घ्या दिवसभरात किती अंड्यांचे आहारात सेवन करावे
एप्रिलफूलच्या दिवशी सर्वच लोक विनोदी संदेश पाठवतात. तुम्ही देखील तुमच्या प्रियजनांना सुंदर सुंदर मेसेज पाठवले. विनोद आणि हास्य शेअर केल्याने सर्वांना मनापासून हसायला येते. या दिवशी घरातील लोक एकमेकांची मस्करी आणि मजा करतात.