आंतरराष्ट्रीय नर्स दिन का साजरा केला जातो?
जगभरात 12 मे ला आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा आहेत. स्वतःच्या घरातील सण उत्सव बाजूला ठेवून रुग्णांच्या सेवेसाठी कायम हजर असणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नर्स दिन साजरा केला जातो. 1971 मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म दिवस होता. त्यानंतर त्यांच्या जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. याशिवाय फ्लोरेन्स नायटिन्गेल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यामुळे त्यांच्या समरणार्थ जगभरात सगळीकडे १२ मे ला जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जात आहे.(फोटो सौजन्य – iStock)
Dinvishesh : भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी ऋषी सुनक यांचा वाढदिवस; जाणून घ्या 12 मे चा इतिहास
इटलीच्या फ्लोरेन्समध्ये विल्यम नाईटिंगेल आणि फेनी यांच्या घरात 12 मे 1820 रोजी फ्लोरेन्स यांचा जन्म झाला होता. त्यानंतर त्यांचे पालनपोषण इंग्लंडमध्ये झाले. मात्र वयाच्या 16 व्या वर्षी त्यांना अशी जाणीव झाली की,आपला जन्म जनसेवेसाठी झाला आहे. गणित, विज्ञान आणि इतिहास या तीन विषयांमध्ये पारंगत असणाऱ्या फ्लोरेन्सना नर्स बनायचे होते. त्यांना गरीब रुग्णांची मदत करायची होती. मात्र त्याच्या वडिलांच्या त्यांच्या इच्छेला विरोध होता. कारण त्या काळी नर्स असलेल्या लोकांना समाजात विशेष महत्व नव्हते. मात्र त्यांनी आपली जिद्द कायम ठेवत 1851 मध्ये नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. त्यानंतर 1853 मध्ये इंग्लंडसारख्या मोठ्या देशात महिलांसाठी पहिले रुग्णायल सुरु केले.
1854 मध्ये क्रीमियामध्ये युद्ध झाले होते. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये ब्रिटीश सैनिकांना कामियामध्ये लढण्यासाठी पाठवण्यात आले होते. ब्रिटन, फ्रान्स आणि तुर्कीचं युद्ध रशियासोबत झाले. या युद्धात अनेक लोक मारली गेली. याशिवाय हजारोच्या संख्येने सैनिक जखमीसुद्धा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच फ्लोरेन्स परिचारिकांचं पथक घेऊन युद्धाच्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. युद्ध झाल्यामुळे तिथे अतिशय बिकट परिस्थिती होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा, पिण्याचं पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना गंभीर आजारांची लागण झाली, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला होता.
फ्लोरेन्स यांनी रुग्णालयाची परिस्थिती सुधारण्यासाठी रुग्णांच्या आंघोळीकडे, खाण्यापिण्याकडे, जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यानंतर सैनिकांच्या परिस्थितीत अतिशय सुधारणा झाली होती. याशिवाय या युद्धात फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी दिवसरात्र काम केले. याशिवाय सैनिकांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला पत्र सुद्धा पाठवण्यात आले होते. या सर्व कामगिरीमुळे 1856 च्या युद्धानंतर फ्लोरेन्स यांचे नाव जगभरात सगळीकडे पोहचले.
क्रोधाला प्रेमाने, पापाला सदाचारने….! बुद्ध पौर्णिमेच्या लाडक्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा
फ्लोरेन्स त्यांच्या मृत्यू 13 ऑगस्ट 1919 ला झाला. त्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ सगळीकडे जागतिक नर्स दिन साजरा केला जाऊ लागला. या खास निमित्ताने नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित केले जाते. दरवर्षी एक विशिष्ट थीम घेऊन नर्स दिन साजरा केला जातो. यावर्षीची 2025 मध्ये “परिचारिका: आरोग्य आणि कल्याण” अशी थीम ठेवण्यात आली आहे.