डोळे कायमच थकल्यासारखे-ताणल्यासारखे वाटते? मग स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा करा वापर
शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांमधून भावना व्यक्त केल्या तर कधी आनंद आणि दुःख सुद्धा व्यक्त केले जाते. माणसाचे डोळे कायमच बोलके असतात. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. डोळे कायमच तेजस्वी आणि टवटवीत दिसावे म्हणून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. हल्ली कामाच्या धावपळीमध्ये डोळ्यांची आरोग्याची जास्त काळजी घेतली जात नाही. ताण, अपुरी झोप, जास्त वेळ स्क्रीनकडे पाहत राहिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडून जाते. काहीवेळा डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे सुजणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. डोळ्यांची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम किंवा लोशन लावले जातात. पण आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य कायमच निरोगी राहील.(फोटो सौजन्य – istock)
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी शरीराला विश्रांती देण्याची जास्त आवश्यकता असते. शांत झोप घेल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच चांगले राहते. बऱ्याचदा डोळ्यांखाली वाढलेले काळे डाग आणि वर्तुळ कमी करण्यासाठी सात ते आठ तासांची शांत झोप घेणे गरजेचे आहे. याशिवाय डोळ्यांमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी गुलाबपाणी, काकडीचे तुकडे किंवा थंड दुधाचा वापर करावा. यामुळे डोळ्यांना आलेली सूज कमी होते.
अनेकांच्या डोळ्यांना काजळ शोभून दिसत नाही. पण काजळ लावल्यामुळे डोळे अतिशय सुंदर दिसतात. काजळ लावल्यामुळे डोळे अतिशय थंड आणि कायमच हेल्दी राहतात. डोळ्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी काजळ लावावे. बाजारातील रसायनयुक्त काजळाचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थानी बनवलेल्या काजळचा वापर करावा.
डोळे सुंदर दिसण्यासाठी वरून अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण डोळ्यांची आतून सुद्धा काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. गाजर, पालक, बदाम, आणि हिरव्या भाज्या खाल्यामुळे डोळ्यांची चमक वाढते. डोळ्यांमध्ये वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. संगणक किंवा मोबाइलवर काम करताना डोळ्यांना चष्मा लावणे आवश्यक आहे.