BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! डेली 2GB डेटासह मिळणार तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी
6000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… HMD Vibe 2 5G चा नवा व्हेरिअंट लाँच; किंमत 15 हजारांहून कमी
एकीकडे खाजगी टेलिकॉम कंपन्या त्यांच्या यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. तर दुसरीकडे सरकारी टेलिकॉम कंपनी यूजर्ससाठी तब्बल 35 दिवसांची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. या प्लॅनची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच यूजर्सना अत्यंत कमी किंमतीत दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि इतर फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
35 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 249 रुपये आहे. म्हणजेच यूजर्सना 300 रुपयांहून कमी पैशांत एका महिन्याहून अधिक दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाणार आहे.
भारत संचार निगम लिमिटेडच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर, हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 2GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जाणार आहे. याशिवाय, यूजर्सना संपूर्ण देशात मोफत नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील मिळणार आहे.
बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लॅन विशेषत: नव्या यूजर्ससाठी सुरु करण्यात आला आहे. म्हणजेच या प्लॅनचा फायदा केवळ नवीन बीएसएनएल यूजर्सना मिळणार आहे. हा एक FRC म्हणजेच फर्स्ट रिचार्ज प्लॅन आहे. कंपनीकडे यापेक्षा कमी किंमतीचा फर्स्ट रिचार्ज प्लॅन देखील उपलब्ध आहे. ज्याची किंमत 108 रुपये आहे.
बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 108 रुपयांचा फर्स्ट रिचार्ज प्लॅन देखील आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. 108 रुपयांचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना रोज 1GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड 80Kbps होणार आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एकूण 500 एसएमएस मिळणार आहे.






