Maharashtra Breaking News LIVE Updates Today:
Maharashtra to National And International Breaking News:
Maharashtra Govt News: राज्य सरकारने उपमुख्यमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांना देण्यात येणारी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिके बंद करण्याचा निर्णय अंशतः मागे घेतला आहे. आता संबंधित मंत्र्यांना ऑनलाइन किंवा मुद्रित अशा दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील सुधारित शासनादेश जारी केला. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आदेशानुसार, १ सप्टेंबरपासून मंत्र्यांना केवळ ऑनलाइन वृत्तपत्रांवर अवलंबून राहावे लागणार होते आणि त्यासाठीचा खर्च संबंधित प्रशासकीय विभागांकडून केला जाणार होता. मात्र, एका दिवसातच या निर्णयात सुधारणा करण्यात आली. ३० जुलैच्या मूळ शासनादेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपवाद ठेवण्यात आला होता. त्यांच्या कार्यालयात आणि अधिकृत निवासस्थानी मुद्रित वृत्तपत्रे व नियतकालिकांचा पुरवठा पूर्ववत सुरू राहणार आहे.
01 Aug 2026 06:50 PM (IST)
Commonwealth Games 2026: सध्या ग्लास्गो स्कॉटलंड येथे कॉमनवेल्थ गेम्स 2026 ही स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतीय खेळाडूंनी कमाल केली आहे. भारतीय मुष्टीयुद्ध प्रकारात जादुमणी सिंगने मंदेंगबाम याने भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. पुरुष बॉक्सिंग प्रकारात जादुमणीने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या बॉक्सिंगपटूंनी आपली शानदार कामगिरी कायम राखली आहे.
01 Aug 2026 06:44 PM (IST)
विजय काते, मिरा रोड : नागरिकांना अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ नागरी सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मिरा-भाईंदर महानगरपालिकेने तीन महत्त्वपूर्ण डिजिटल सेवांचा शुभारंभ केला आहे. शनिवारी (1 ऑगस्ट) आयोजित कार्यक्रमात महापौर डिंपल विनोद मेहता यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी (NOC) पोर्टल आणि Pothole Reporting & Repair System या मोबाईल ॲपची सुरुवात करण्यात आली. या सेवांमुळे नागरिकांना अनेक महत्त्वाची कामे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार असून महापालिकेच्या डिजिटल प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे.
01 Aug 2026 06:33 PM (IST)
विजय काते, मिरा रोड : आर्थिक अडचणींचा वारंवार दाखला देणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेने झाडांच्या धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी तब्बल २५ लाख रुपये खर्च करून दोन ‘मॅक लिफ्टन’ (हायड्रॉलिक बूम लिफ्ट) वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मांडल्याने प्रशासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महापालिकेकडे आधीपासूनच दोन हायड्रॉलिक शिडी वाहने उपलब्ध असतानाही अतिरिक्त खासगी वाहने भाड्याने घेण्याची वेळ का आली, याबाबत विरोधकांसह नागरिकांकडून सवाल उपस्थित होत आहेत.
01 Aug 2026 06:28 PM (IST)
‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या घरी महायुतीतील दोन नेत्यांनी दिलेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर दिपके यांचे नाव देशभरात चर्चेत आले. त्यानंतर त्यांच्या भेटीवरून महायुतीत नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे.
01 Aug 2026 06:11 PM (IST)
Bank Jobs 2026: बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनकडून CRP CSA-XVI अंतर्गत क्लर्क भरती २०२६ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आयबीपीएसच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे देशभरातील ११ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एकूण ११,४०३ क्लर्क पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
01 Aug 2026 05:53 PM (IST)
भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. India vs Sri Lanka कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांमध्ये एक सराव सामना खेळला जाईल. या एकमेव सराव सामन्याच्या वेळापत्रकात लक्षणीय बदल करण्यात आला आहे. मूळतः चार दिवस चालणारा हा सामना आता तीन दिवसांचा करण्यात आला आहे. हा सराव सामना ७ ऑगस्ट रोजी कोलंबो येथील एनसीसी मैदानावर सुरू होईल आणि ९ ऑगस्टपर्यंत चालेल. बीसीसीआय निवड समितीने या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा संघ जाहीर केला आहे.
01 Aug 2026 05:43 PM (IST)
राष्ट्रकुल क्रीडा २०२६ (Commonwealth Games 2026) स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारतीय महिला बॉक्सरांनी शानदार सुरुवात केली. भारतीय बॉक्सर प्रीती पवारने महिलांच्या ५४ किलो वजनी गटात पहिले सुवर्णपदक पटकावले. प्रीतीने अंतिम सामना जिंकून देशाला राष्ट्रकुल क्रीडामधील बॉक्सिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर लगेचच जस्मिन लंबोरियाने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात दुसरे सुवर्णपदक पटकावले. प्रीतीने संपूर्ण लढतीत उत्कृष्ट टेकनिक, संयम आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले आणि तिन्ही फेऱ्यांमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर आघाडी कायम ठेवली
01 Aug 2026 05:30 PM (IST)
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. प्रधानमंत्री पीक विमा ( PM Crop Insurance ) योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलैवरून वाढवून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात आली आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे. तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नेमक काय म्हणाले कृषीमंत्री? आणि तुमच्या विभागाची आकडेवारी काय आहे? सविस्तर जाणून घेऊयात.
01 Aug 2026 05:17 PM (IST)
राज्यातील रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी मोटार वाहन विभागामार्फत लवकरच ‘महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण’ आखण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. रुग्णवाहिका ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचविणारी महत्त्वाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णवाहिकांच्या नोंदणीपासून ते प्रत्यक्ष सेवा, प्रतिसाद वेळ, दरनिश्चिती आणि रुग्णालयात पोहोचण्यापर्यंतची व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्याचा या धोरणाचा उद्देश असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
01 Aug 2026 05:08 PM (IST)
पुण्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानचिन्ह, पारंपरिक पुणेरी पगडी, धनादेश आणि ‘गीतारहस्य’ ग्रंथाची प्रत देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात अजित डोवाल यांनी विशेषतः Gen-Z तरुणांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजून घेण्याचे आवाहन केले.
01 Aug 2026 04:57 PM (IST)
अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लावून आता ४७ वर्ष झाली आहेत . तसेच इराणच्या परदेशातील संपत्ती आणि पैसे देखील सीझ केले आहेत . तरी देखील इराण अजून अमेरिकेचा आणि इस्राइल चा मुकाबला करतोच आहे . इस्रायल ने सध्या तरी इराणवरील हल्ले थांबवले असले तरी अमेरिका ने हल्ले सुरु केले आहेत . याच बरोबर इराण देखील तेवढाच जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे . आखाती देशांनी सुद्धा आपल्या जागा अमेरिकन सैन्याला दिल्या आहेत . याच्या बदल्यात इराणने सौदी , जॉर्डन , कुवैत यांच्यावर देखील हल्ले केले आहेत . याच युद्धात हुतींनी आणि इराक मधील इराण बंडखोर समर्थकांनी सुद्धा आपला मोर्चा आखाती देशांवर हल्ले करत वळवला आहे .
01 Aug 2026 04:47 PM (IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूवरील "फिंगरप्रिंट तपासावेत" अशी केलेली टीका आता राजकीय वादाचा नवा विषय ठरली आहे. या वक्तव्याला उत्तर देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार करत, "त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढण्याची आवश्यकता आहे," अशी टीका केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित साटम म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचे सध्या ना विधानसभा, ना लोकसभेत प्रतिनिधित्व आहे. मुंबई महानगरपालिकेतही मर्यादित संख्येने नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे इतरांवर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या राजकीय कामगिरीचा आढावा त्यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.
01 Aug 2026 04:41 PM (IST)
बीड जिल्हा प्रशासनात एक खळबळजनक घटना घडली आहे. ती म्हणजे एका अधिकाऱ्याला तब्बल एक दोन नव्हे तर ४५ लाख रुपयांची लाच घेताना पकडल आहे. एसीबीने ही कारवाई केली आहे. सामाजिक वनीकरण विभागात प्रथम श्रेणी दर्जावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. श्रीनिवास लखमवाड असं या अधिकाऱ्याच नाव आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. कॅनोल रोड ही कारवाई पथकाकडून करण्यात आली आहे. एसीबीने कारवाई करत असताना बनावट नोटांचा वापर केला आणि त्या जाळ्यात हा अडकला आहे. वाचा सविस्तर...
01 Aug 2026 04:37 PM (IST)
आपल्या शांतताप्रिय संस्कृतीसाठी आणि धार्मिक सौहार्दासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेजारील देश नेपाळमध्ये अचानक जातीय तणावाचा भीषण भडका उडाला आहे. नेपाळच्या (Nepal) मधेश आणि कोशी प्रांतातील जनकपूर, धनुषा आणि सुनसरी या सीमावर्ती भागांमध्ये दोन धार्मिक समुदायांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. केवळ लाऊडस्पीकरचा आवाज आणि धार्मिक झेंडे फडकवण्यावरून सुरू झालेल्या या वादाने संपूर्ण मधेश प्रांतात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून स्थानिक प्रशासनाने जनकपूर शहरासह प्रमुख चार जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी कडक संचारबंदी (Curfew) लागू केली आहे.
01 Aug 2026 04:00 PM (IST)
जावळी तालुक्याचे सुपुत्र आणि नवी मुंबई शिवसेना संपर्कप्रमुख व नगरसेवक अंकुश बाबा कदम यांची शिवसेने पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेसमोर मांडण्यासाठी तसेच माध्यमांशी समन्वय साधण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
01 Aug 2026 03:55 PM (IST)
बिहार येथून के मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका नराधमाने आपल्या २५ वर्षीय वाहिनीचे कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा शीर घरासमोरील झाडाला लटकवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. घडलेली घटना जेहानाबाद जिल्ह्यातील आहे. अंशू देवी (वय 25) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मात्र त्याने असं का केले? जाणून घ्या…
01 Aug 2026 03:50 PM (IST)
नैसर्गिक आपत्तींशी नेहमीच लढा देणाऱ्या जपानमध्ये भूकंपाचे धक्कादायक सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. उत्तर जपानमधील (आओमोरी (Aomori) प्रांतात शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४८ वाजता रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपान हवामान संस्थेने (Japan Meteorological Agency – JMA) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरीच्या पॅसिफिक किनाऱ्याजवळ जमिनीच्या पातळीपासून सुमारे ८० किलोमीटर खोलवर होता. या भूकंपाचे भौगोलिक केंद्र ४१.३ अंश उत्तर अक्षांश आणि १४२.० अंश पूर्व रेखांशावर नोंदवले गेले आहे.
01 Aug 2026 03:45 PM (IST)
Sanjay Raut News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज पुणे दौऱ्यावर आहेत. पण काँग्रेसने हा दौरा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यावर पुणे दौऱ्यात गोंधळ घातल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपनेही दिला होता. या घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या हा इशारा थेट धुडकावून लावला आहे. तुम्ही काय हिंसेच्या गप्पा करता तुमच्या लाठीचार्जनंतरही मुलं क्रांती करायला तयार झाली. तुम्ही आडवे येऊ नका, 2029च्या आधीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा बाजार उठलेला असेल.” अशा शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
01 Aug 2026 03:42 PM (IST)
मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्व (पॉलिगॅमी) प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. मुस्लिम समाजातील बहुपत्नीत्वाची प्रथा पूर्णपणे बंद का करण्यात येऊ नये, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.
01 Aug 2026 03:35 PM (IST)
चंद्रपूर: जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र जलमय वातावरण निर्माण झाले आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी नदीपात्रातील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. मात्र, या मुसळधार पावसानंतरही जिल्ह्यातील एकाही मोठ्या किंवा मध्यम सिंचन प्रकल्पातून अद्याप ‘ओव्हरफ्लो’ झालेला नसल्याच सुरू वास्तव आहे.
01 Aug 2026 03:25 PM (IST)
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या ( Commonwealth Games 2026) स्पर्धेत ३१ जुलै हा भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. डेकॅथलॉन स्पर्धेत भारताच्या तेजस्विन शंकरने १५०० मीटर शर्यतीत एकूण ७९७६ गुणांसह तिसरे स्थान पटकावून कांस्य पदक जिंकले. यासह, डेकॅथलॉन स्पर्धेत पदक जिंकणारा तेजस्विन शंकर हा पहिला भारतीय खेळाडू ठरला. भारताने डेकॅथलॉन प्रकारातही प्रथमच पदक जिंकण्यात यश मिळवले.
01 Aug 2026 03:17 PM (IST)
Raj Thackeray Speech News Marathi: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत (Mumbai News) आयोजित मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मंदिरांतील दानपेट्यांमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार टीका केली. विशेषतः मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दरवर्षी सुमारे 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.
01 Aug 2026 03:10 PM (IST)
T20 Cricket Most Runs Record: जोस बटलर हा इंग्लंडचा सर्वाधिक आक्रमक फलंदाज आणि यशस्वी विकेटकिपर म्हणून ओळखला जातो. सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ या क्रिकेट स्पर्धेत स्फोटक फलंदाज आणि विकेटकिपर जोस बटलर याने 31 जुलै रोजीच्या सामन्यात तुफानी खेळी केली आहे. त्याने 55 रन्स करत शानदार अर्धशतक लगावले आहे. तसेच लवकरच एक नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे.
01 Aug 2026 02:59 PM (IST)
मनसेच्या विद्यार्थी सेनेचा मुंबईत मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात राज ठाकरे बोलत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिराच्या चोरीबद्दल पंतप्रधानांनी बोलायला नको का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. तसेच दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींना शिविगाळ केली ती चुकीचीच आहे. पण दुसऱ्यांनाही आया असतात असा टोला त्यांनी लगावला. शिक्षण पद्दतीत बदल करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
01 Aug 2026 02:57 PM (IST)
Nagpur Crime – अवैध पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला अमीन पटेल (रा. हसनबाग) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्या प्रकरणी पोलिसांनी त्याला पुन्हा अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर तुरुंगात पाठविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनला सुमारे चार महिन्यांपूर्वी अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.
01 Aug 2026 02:50 PM (IST)
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय.. केंद्रीय मंत्रिमंडळाने 'पंतप्रधान किसान सन्मान निधी' म्हणजेच पीएम किसान योजनेला पुढील पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्यास मंजुरी दिलीये.. त्यामुळे ही योजना 2030-31 पर्यंत सुरु राहणार आहे. कालावधीतही सुरू राहणार आहे. या योजनेसाठी सरकारने 3 लाख 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केलीये..
01 Aug 2026 02:41 PM (IST)
अमित शाहांचा पुणे दौऱ्यावरुन संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे. 'संसदेचं अधिवेशन सोडून शाह पुण्यात फिरताहेत, परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेवेळी कुठे होते? अशा शब्दांत त्यांनी प्रश्न विचारला. अमित शाह एकदाही संसेदत आले नाही, पेपरफुटीला शाहांचं गृह खाते जबाबदार असल्याचं ही संजय राऊत म्हणाले.
01 Aug 2026 02:30 PM (IST)
अचानक अभिजीत दिपके यांची तब्येत खालावली आहे. अभिजीत दिपकेंना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्याची माहिती आहे. भेटीसाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधत असताना अभिजीत दीपके यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. तब्येत बिघडल्याने त्यांनी भेट अर्धवट सोडली आणि उर्वरित नागरिकांना न भेटताच दिपके घरी परतले. सध्या डॉक्टरांकडून अभिजीत दिपके यांच्यावर घरीच उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे.
01 Aug 2026 02:20 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथील या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थितीत आहे. रोहित टिळक यांच्या लोकमान्य टिळक ट्रस्ट कडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी आज अमित शहा पुण्यात आले आहेत.
01 Aug 2026 02:11 PM (IST)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे येथे हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. ते म्हणाले, अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेला नवा आयाम दिला. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले. डोवाल यांनी जीव धोक्यात घालून देशासाठी कार्य केलं. राष्ट्रीय सुरक्षेतील चाणक्याला दुसऱ्या चाणक्याकडून पुरस्कार मिळाल्याचे गौरद्वार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
01 Aug 2026 02:00 PM (IST)
टेक कंपनी टेक्नोने IFA 2026 मध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्यांच्या नेक्स्ट-जेन बेझललेस कॉन्सेप्ट फोनचा टिझर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केला आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा 0mm डिस्प्ले बॉर्डर असलेला स्मार्टफोन आहे. हे कॉन्सेप्ट डिव्हाईस सप्टेंबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या शो स्टॉपर ईव्हेंटदरम्यान सादर केले जाण्याची शक्यता आहे, यावेळी कंपनी त्यांची नवीन डिस्प्ले टेक्नोलॉजी सादर करणार आहे.
01 Aug 2026 01:55 PM (IST)
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (1 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अजित डोवाल हेदेखील आले आहेत. अमित शहा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील अलीकडील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून निदर्शने होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी अनेक काँग्रेस आणि युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे.
01 Aug 2026 01:45 PM (IST)
३१ जुलै, प्रत्येक टॅक्सपेअरसाठी महत्त्वाचा दिवस होता. कारण आयटीआर दाखल करण्याची ही अंतिम मुदत होती. बहुतेक करदात्यांनी आपला आयटीआर वेळेवर दाखल केला आहेत पण काही कारणास्तव टॅक्स भरला नसेल किंवा शेवटच्या क्षणी टॅक्स दाखर करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला असेल. त्यामुळे त्यांना टॅक्स भरता आला ( Belated ITR Filing ) नसेल तर मग काय? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या आर्टिकलमध्ये मिळेल. नेमका काय आहे नियम सविस्तर जाणून घेऊयात.
01 Aug 2026 01:35 PM (IST)
बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या (BCI) ३१ जुलैच्या पोर्टल डेडलाइनला हुकणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी महाविद्यालयांनी गुरुवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. याच वेळी, प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी विद्यापीठाने ठोठावलेला दंड ‘आक्षेप नोंदवून’ भरण्याची तयारी महाविद्यालयांनी दर्शवली आहे. उच्च न्यायालयाने याची नोंद घेत, विद्यापीठाने ठोठावलेला दंड आणि ५० टक्के जागांची कपात कायदेशीररीत्या योग्य आहे की नाही, यावर पुढील आठवड्यात अंतिम सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.
01 Aug 2026 01:25 PM (IST)
देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना राज्यातून समोर आली आहे. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून ‘आम्हाला शिक्षक द्या’ ही एकच मागणी करत आहेत. ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ… सेव चाइल्ड’ सारख्या मोठ्या गोष्टी सरकार सांगते, तर मग आम्हाला शिकवण्यासाठी शाळेत शिक्षक का पाठवत नाही? असा सवाल करत विद्यार्थ्यांनी तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. हे संपूर्ण प्रकरण गेल्या ४ वर्षांपासून शिक्षकच नसलेल्या एका शाळेबाबतचे आहे.
01 Aug 2026 01:15 PM (IST)
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain Update) अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने विविध भागांसाठी इशारे जारी केले आहेत. नद्या, धरणे आणि जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा यलो नाऊकास्ट अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
01 Aug 2026 01:05 PM (IST)
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार एकत्र काम करतात, पण काही मैत्री काळाच्या कसोटीवरही तितकीच मजबूत राहते. सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री ही अशाच नात्यांपैकी एक मानली जाते. अनेक वर्षांपासून दोघांमध्ये असलेला जिव्हाळा आजही तसाच कायम आहे. नुकताच सलमानने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्यांची मैत्री पुन्हा चाहत्यांसमोर आली. सलमान खानने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संजय दत्तसोबतचा एक खास फोटो शेअर केला. या छायाचित्रात दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. फोटोमध्ये दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत नसले तरी त्यांच्यातील आपुलकी आणि घट्ट नातं सहज जाणवतं. ही पोस्ट समोर येताच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला.
01 Aug 2026 01:00 PM (IST)
Rate 1 August: ऑगस्ट महिना सामान्यांना थोडा दिलासा घेऊन आला आहे. मागील बरेच महिने महागाईचा झटका सुरु असताना महिन्याचा पहिल्या तारीखला दर थोडे ओसरल्याची चिन्हे दिसत आहेत. तेल विपणन कंपन्यांनी १ ऑगस्टपासून ( Rate 1 August ) 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत २०० रुपयांपेक्षा अधिक किमतीने कमी केल्या आहेत. दिल्लीत सिलेंडर २०२ रुपयांनी तर कोलकाता शहरात हे दर २०९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, या दिलासासोबतच सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही कमी झाल्या आहेत का?
01 Aug 2026 12:55 PM (IST)
Jalgaon Rain News: गेल्या दोन दिवसापासून जळगावात कोसळू लागला आहे. परंतु दुसरीकडे शहरातील रस्त्याची भयानक अवस्थाह आता उघडी पडू लागली आहे. मुख्य रस्त्यासह अनेक भागात खड्डे पाण्याच भरले आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याचे रस्त्यावर तलाव स्वरुप निर्माण झाले. त्यामुळे जळगावकर त्रस्त झाले असून यासर्व परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. पालकमंत्री पाटीलांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे ते केवळ ‘ग्रामीण’ भागाचे पालकमंत्री आहेत की ‘शहरा’चे असा प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. सध्या पडणाऱ्या पावसामुळे नागरिक खुश आहेत, मात्र शहराची स्थिती पाहता स्थानिकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण होत आहे.
01 Aug 2026 12:50 PM (IST)
आपल्या सर्वांना माहिती आहे की, मागील काही दिवसांपासून आसामवर नैसर्गिक आपत्ती आणि विनाशकारी पुराचे संकट ओढावले आहे. चारही दिशांना पसरलेले पाणी आणि त्यात वाहून गेलेले लोकांचे विश्व… हे सर्वच दृष्य पाहताना फार भयानक वाटते. पुराचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर समोर येत असतानाच एका नव्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओत एक लष्करी जवान चिमुकल्या लहान बाळाचे पूरातून संरक्षण करताना दिसून येतो. आजूबाजूला काय घडतं आहे याची कोणतीही कल्पना नसताना बाळ अगदी शांतपणे जवानाच्या कुशीत झोपलेले असते. या हृदयस्पर्शी रेस्क्यूचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून व्हिडिओतील दृष्ये पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
In the swirling chaos of the Assam floods, a tiny infant sleeps soundly in the arms of a rescuer — unaware of the danger, trusting completely in the strangers braving the waters to carry them to safety.
A single moment of pure innocence amid devastation… and a powerful reminder… pic.twitter.com/QWcpvsYgJP
— Sanjay Deka (@SanjayDekaFLJ) July 30, 2026
credit - social media and Twitter
01 Aug 2026 12:45 PM (IST)
युक्रेनची राजधानी (Russia Ukraine War) कीव शहरावर रशियन सैन्याने पुन्हा एकदा अतिशय क्रूर आणि विनाशकारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ला करून संपूर्ण परिसराचे स्मशानभूमीत रूपांतर केले आहे. शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे अवघे शहर स्फोटांच्या आवाजाने थरथरले. अवघ्या ४८ तासांत रशियाकडून झालेला हा दुसरा मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यात निष्पाप लहान मुलांसह कमीत कमी ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २७ हून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक निवासी इमारती आणि व्यावसायिक संकुल आगीच्या ज्वाळांमध्ये भस्मसात झाली आहेत.
01 Aug 2026 12:40 PM (IST)
Jalgaon Rain News: गेल्या दोन दिवसापासून जळगावात कोसळू लागला आहे. परंतु दुसरीकडे शहरातील रस्त्याची भयानक अवस्थाह आता उघडी पडू लागली आहे. मुख्य रस्त्यासह अनेक भागात खड्डे पाण्याच भरले आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याचे रस्त्यावर तलाव स्वरुप निर्माण झाले. त्यामुळे जळगावकर त्रस्त झाले असून यासर्व परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. पालकमंत्री पाटीलांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे ते केवळ ‘ग्रामीण’ भागाचे पालकमंत्री आहेत की ‘शहरा’चे असा प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. सध्या पडणाऱ्या पावसामुळे नागरिक खुश आहेत, मात्र शहराची स्थिती पाहता स्थानिकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण होत आहे.
01 Aug 2026 12:35 PM (IST)
मसूर : किवळ-ज्योतिबा बससेवेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. किवळ व परिसरातील गावांतील भाविकांची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दर पौर्णिमेला ही बस सेवा सुरू राहणार आहे. माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा संगीता तानाजीराव साळुंखे (माई) यांनी परिसरातील भाविकांच्या वतीने कराड आगार प्रमुखांना निवेदन देऊन बस सुरू करण्यासंदर्भात मागणी केली होती. किवळ ते जोतिबा डोंगर या मार्गावर थेट वाहतूक सुविधा नव्हती. किवळ, कराड, कोल्हापूर, वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर अस टप्प्याटप्प्याने प्रवास भाविकांना करावा लागत होता. यामध्ये वेळ, आर्थिक भुरदंड, मनस्ताप सहन करावा लागत होता. बस सुरू करण्यासंदर्भात निवेदनाची तात्काळ दखल आगार प्रशासनाने घेतली व बस सेवा त्वरित सुरू केली.
01 Aug 2026 12:30 PM (IST)
Palghar News : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा नियमित पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी पालघर (Palghar News), ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांवर आंदोलन करण्यात आले. हातात रिकाम्या थाळ्या घेऊन विद्यार्थ्यांनी सरकार खाते तुपाशी, आम्ही राहतो उपाशी! अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले, विद्यार्थ्यांच्या मोठ्या सहभागामुळे प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेतली.
01 Aug 2026 12:25 PM (IST)
Abhijeet Dipke on BJP IT Cell: जंतरमंतरवर झालेल्या झेन-झी आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी आंदोलकांच्या वादग्रस्त घोषणाबाजी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशा विद्यार्थ्यांवर अनेक ठिकाणीं गुन्हे दाखल केले जात असल्याची समोर येऊ लागले आहे. त्यानंतर एका मुलीने जाहीर माफी देखील मागितली. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल रद्द करण्याची मागणी केली आहे.
01 Aug 2026 12:15 PM (IST)
काही दिवसांपूर्वीच मार्क झुकरबर्गच्या मालकीची कंपनी असलेल्या मेटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबूकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ हटवला होता. यानंतर सरकारने कंपनीच्या भारत प्रमुखांना बोलावले होते. हटवण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून जनरेशन झेडला संबोधित करत आहेत. मात्र हा व्हिडीओ अचानक हटवण्यात आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या सर्व प्रकरणानंतर मेटाने यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला स्पष्टीकरण दिले आणि सरकारची माफी मागितली. आता मेटाने व्हिआयपी अकाऊंट्समध्ये बदल करण्याबाबत काही नवीन नियम जारी केले आहेत.
01 Aug 2026 12:10 PM (IST)
Commonwealth Games 2026 च्या नवव्या दिवशी भारताने भालाफेकीत दोन पदके जिंकून शानदार कामगिरी केली. सर्वांचे लक्ष भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रावर होते, ज्याने ८५.८३ मीटर भालाफेक करून रौप्य पदक जिंकले, तर यशवीर सिंगने ८५.४१ मीटर भालाफेक करून कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेतील सुवर्णपदक श्रीलंकेच्या रुमेश थरंगा पाथिरागेने पटकावले, ज्याने ८९.७५ मीटर भालाफेक केली.
01 Aug 2026 12:05 PM (IST)
जबाबदारी टाळण्यासाठी सुरू असलेली टाळाटाळ लक्षात घेता शुक्रवारी (दि. ३१) सत्ताधाऱ्यांकडूनच संताप व्यक्त करण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांनी, लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे हे विसरून चालणार नाही असा सज्जड दम भरत, शहराच्या दुर्देशेला महानगरपालिका आयुक्तच जबाबदार असून, त्यांनी याची जबाबदारी घ्यावीच लागेल, असा इशाराही दिला. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली. नाशिकच्या दौऱ्यावर आलेले कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांना मनसेने घेराव घालून परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल केला.
01 Aug 2026 11:59 AM (IST)
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व ISO प्रमाणित 'युवा शेतकरी प्रशिक्षण केंद्र' यांच्या वतीने आयोजित शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय प्रशिक्षण वर्ग अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या युवा वर्ग, शेतकरी आणि महिलांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अत्यंत आनंद व समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार पतसंस्था, तांत्रिक भवन, अहिल्यानगर येथे या सशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
01 Aug 2026 11:53 AM (IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यात आयोजित केले गेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही मतदारसंघात हे अभियान राबविण्यात आले. जे लोक शासकीय योजनांपासून वंचित आहेत, त्यांना याचा फायदा व्हावा म्हणून हे शिबिर आयोजित केले गेले. याचा लाभ जास्तीत जास्त लोक घेतायत, समाधानही व्यक्त करीत आहेत. गतिमान प्रशासन म्हणजे नक्की काय असते याचे उत्तम उदाहरण या अभियानातून समोर आले आहे.





