Maharashtra Breaking News Updates Today
Satara Heavy Rainfall: तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
या परिसरात नागरिकांना शुक्रवारी उकाडा असह्य झाला होता. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ढगाळ वातावरण होण्यास सुरुवात झाले. तर दुपारी दीड वाजता पावसाला सुरुवात झाली. मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली
23 May 2026 04:55 PM (IST)
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन ‘स्व. अरुणकाका साहित्य नगरी’ येथे कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण आणि जल्लोषात पार पडले.
23 May 2026 04:50 PM (IST)
डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई खोणी पलावा येथील डाऊन टाऊन आणि क्राऊन पलावा या इमारतीत कॉम्बिग ऑपरेशन २४ नायजेरियन नागरिक ताब्यात या मध्ये १४ पुरुष ६ महिला ४ मुलांचा समावेश या मध्ये ८ नागरिकाकडे कोणताही अधिकृत कागदपत्रे नाही.
23 May 2026 04:45 PM (IST)
एच डी एफ सी चिपळूण शाखेत कार्यरत 33 वर्षीय युवक काल दुपारी तीन वाजल्यापासून बेपत्ता झाल्याची नोंद शिरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.मुकुंद मुरलीधर पालांडे असे त्यांचे नाव असून ते अलोरे गावचे रहिवासी आहेत.बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी स्वतःचे हाताने चार पानी पत्र लिहिले असून एच डी एफ सी चिपळूण शाखेतील चार जणांची आपल्या आत्महत्येस जबाबदार म्हणून नावे नोंदवली आहेत.दोन दिवसापूर्वी चिपळूण विरेश्वर तलाव येथे त्याला काही तरुणांनी मारहाण केली होती.ओळखीच्या पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविण्याचा उल्लेख त्या पत्रात केला आहे.आपणास मानसिक त्रास आणि ब्लॅकमेल केल्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने म्हटले आहे.
23 May 2026 04:40 PM (IST)
पालघरच्या बोईसर येथे शिवसेना आदिवासी विकास विभाग आणि आधार प्रतिष्ठानतर्फे 201 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला. गृहराज्यमंत्री Yogesh Kadam यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला, तर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गोतस्करीतील सराईत आरोपींवर मकोका कारवाईचा इशाराही योगेश कदम यांनी दिला.
23 May 2026 04:35 PM (IST)
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग रोडसाठी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. मात्र याच परिसरातून चेन्नई-सुरत महामार्गही जात असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी दुहेरी अधिग्रहणात येत आहेत.
23 May 2026 04:25 PM (IST)
नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग रोडसाठी अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. मात्र याच परिसरातून चेन्नई-सुरत महामार्गही जात असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी दुहेरी अधिग्रहणात येत आहेत.
23 May 2026 04:25 PM (IST)
मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिल्व्हर पार्क परिसरातील जहांगीर सर्कलजवळ असलेल्या अर्बन पफ शॉपवर पोलिसांनी धाड टाकून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या ई-सिगारेटचा सुमारे २ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात प्रतिबंधित ई-सिगारेटची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. धाडीदरम्यान मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट जप्त करण्यात आल्या.
23 May 2026 04:20 PM (IST)
लातूर शहरात मोकाट श्वानांचा त्रास गंभीर बनला असून, श्वान चावल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे. याआधी दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.
23 May 2026 04:15 PM (IST)
रत्नागिरी शहरानजीकच्या कुवारबाव साईनगर परिसरात सात बंगल्याच्या मागे गुरुवारी रात्री घडलेल्या थरारक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. सूरज राजाराम झोरे (वय 25, मूळ रा. नायरी, संगमेश्वर; सध्या रा. विरार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव असून अज्ञात कारणातून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचाही पूर्ण पत्ता अद्याप उपलब्ध नाही) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत सूरजची बहीण नंदा रमेश फाले (वय 32, रा. राजेंद्र कॉम्प्लेक्स, तिरुपती बिल्डिंग, दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सूरज काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. गुरुवारी रात्री 9.30 ते 10.53 वाजण्याच्या दरम्यान साईनगर येथील सात बंगल्याच्या मागील रेल्वे ट्रॅक परिसरात सूरज आणि त्याचे काही साथीदार एकत्र बसले होते. यावेळी कोणत्यातरी कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
23 May 2026 04:10 PM (IST)
मीरा-भाईंदर परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑटो रिक्षा बॅज (बिल्ला), परमिट आणि अन्य सरकारी लाभ मिळवल्याचा मोठा प्रकार उघडकीस आला असून प्राथमिक चौकशीत 30 संशयितांपैकी 27 जणांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक अज्ञात साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाबाबत यापूर्वी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी संशय व्यक्त करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तक्रार केली होती. परिवहन विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी चौकशीची मागणी केली होती.
23 May 2026 04:08 PM (IST)
मीरा-भाईंदर वसई-विरार (MBVV) पोलिसांच्या झोन-1 पथकाने मोठी कारवाई करत जप्त केलेला सुमारे ₹65 लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. यामध्ये ₹50 लाख किमतीची सुमारे 4,000 लिटर अवैध दारू आणि ₹15 लाख किमतीचा गुटखा उत्पादनांचा समावेश होता.ही कारवाई विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेल्या 175 गुन्ह्यांशी संबंधित असून, MBVV परिसरातील अवैध दारू आणि तंबाखू व्यापाराविरोधातील पोलिसांच्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून राबविण्यात आली.
23 May 2026 04:07 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आज शिर्डी येथे होणाऱ्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी जाताना त्यांनी सरकारी ताफ्याऐवजी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. सावळीविहीर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री थेट रेल्वेने शिर्डीत दाखल झाले आहेत.
23 May 2026 03:58 PM (IST)
महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून तापमान तब्बल ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असेच बदलते वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
23 May 2026 03:46 PM (IST)
वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरातील झोपडपट्ट्या हटवण्याची कारवाई आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अतिक्रमण हटवण्याचा आज पाचवा दिवस असून प्रशासनाकडून उर्वरित ढिगारा हटवण्याचे काम वेगाने सुरू आहे. संपूर्ण परिसर मोकळा झाल्यानंतर येथे रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला सुरुवात होणार आहे. भविष्यात या ठिकाणी आधुनिक सुविधा असलेला भव्य इंटिग्रेटेड रेल्वे हब उभारण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
23 May 2026 03:37 PM (IST)
जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात काही दिवसांपासून इंधन टंचाईची चर्चा असून राज्यातही पेट्रोल पंपांवर याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी तर गर्दीमुळे हाणामारीचे प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलची कोणत्याही प्रकारची टंचाई नसून शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावू नयेत, असं भरणे यांनी म्हटलं आहे.
23 May 2026 03:22 PM (IST)
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘मातोश्री’वर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. दरम्यान त्यानंतर आता बच्चू कडू यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा शब्द दिला होता, मात्र राज्यमंत्रिपद दिलं. माझ्याऐवजी गडाख यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच गोवाहाटीला जाताना देखील उद्धव ठाकरे यांना मी विचारलं होतं असंही ते म्हणाले आहेत.
23 May 2026 02:59 PM (IST)
इराण युद्धाची ठिणगी पडल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) आणि गॅसच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. या ऊर्जा संकटामुळे जगभरातील पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली असून विकसनशील देशांचे बजेट कोलमडले आहे. या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी जगातील २७ देशांनी जागतिक बँकेकडे (World Bank) आपत्कालीन आर्थिक मदत मिळवण्यासाठी तातडीने अर्ज केले आहेत. वाढती महागाई आणि इंधनाचा तुटवडा यामुळे या देशांवर आर्थिक आणीबाणीचे सावट आहे.
23 May 2026 02:50 PM (IST)
राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. आज कोकणासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवी आहे. सातारा, कोल्हापूरसह 7 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
23 May 2026 02:38 PM (IST)
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. 2026 ते 2029 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी शरद पवार हेच रयत शिक्षण (Rayat Shikshan Sanstha) संस्थेचे अध्यक्ष असणार आहेत
23 May 2026 02:30 PM (IST)
नाशिकच्या दिंडोरीत बोगस बियाणे पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.. अक्राळे-जानोरी मार्गावरील पॅकेजिंग इंडस्ट्रीवर पोलिसांनी छापा टाकला असून पाचोऱ्यातील नामांकित सिड्स कंपनीच्या नावाची तब्बल ६ हजार बनावट रिकामी पाकिटे जप्त करण्यात आली आहे.
23 May 2026 02:19 PM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सार्वजनिक वाहतूक वापरण्याचं आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. आज शिर्डी येथे होणाऱ्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी जाताना त्यांनी सरकारी ताफ्याऐवजी वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. सावळीविहीर येथे पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री थेट रेल्वेने शिर्डीत दाखल झाले आहेत.
23 May 2026 02:10 PM (IST)
महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून तापमान तब्बल ४७ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असेच बदलते वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
23 May 2026 02:00 PM (IST)
डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत चालला आहे. रुपयाचं मुल्य वाचवण्यासाठी RBI नं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहेत. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान रुपयाच्या विनिमय दरातील अस्थिरता रोखण्यासाठी आपल्या डॉलर विक्रीत लक्षणीय वाढ केली आहे. या कालावधीत, मध्यवर्ती बँकेने संपूर्ण आर्थिक वर्षात एकूण ५३.१ अब्ज डॉलर्सची निव्वळ विक्री नोंदवली. हा आकडा मागील आर्थिक वर्ष, २०२४-२५ मध्ये नोंदवल्या गेलेल्या ४१.१ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ विक्रीच्या तुलनेत १२ अब्ज डॉलर्सची वाढला आहे. इतकी वाढ कशी काय? जाणून घेऊयात.
23 May 2026 01:55 PM (IST)
आयपीएल २०२६ चा ६७ वा लीग स्टेज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. या हायस्कोअरिंग सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरला ५५ धावांनी पराभूत केले. हा सामना केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीपर्यंत मर्यादित नव्हता तर या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली, ज्यामुळे मैदानावरचे वातावरण तापले. मात्र, सामना संपल्यानंतरही कोहलीचा राग कायम होता आणि त्याने हेडशी हँडशेक करण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या वादानंतर विराट कोहली क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि त्याने आपली विकेट गमावली.
23 May 2026 01:50 PM (IST)
भारतीय वायुसेनेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी एक खुशखबर आहे. आता भारतीय वायुसेनेने ऑफिसर पदांच्या भरतीसाठी AFCAT परीक्षेची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही भरती लेखी परीक्षा न घेताही वायुसेनेत ऑफिसर बनण्याची संधी उपलब्ध करून देते. पण ती कशी आणि कोणासाठी चला तर मग जाणून घेऊया…
23 May 2026 01:45 PM (IST)
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक समोर आली आहे. 24 वर्षे तरुण आपल्या मुलासाठी डायपर आणण्यासाठी घराबाहेर पडला होता मात्र काही क्षणातच तो रक्तबंबळ अवस्थेत सापडून आला. घडलेली घटना सोलापुरातल्या विजापूर रोड परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडालेली आहे.
23 May 2026 01:35 PM (IST)
अलीकडेच टेक कंपनी iQOO ने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने iQOO 15T या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेले नवीन डिव्हाईस देशामध्ये ब्रँडच्या फ्लॅगशिप लाईनअपमध्ये समाविष्ट झाला आहे. नवा स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. नव्या डिव्हाईसचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.
23 May 2026 01:25 PM (IST)
नरिमन पॉईंट येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या २२ मजली एअर इंडिया बिल्डिंगच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या अधिग्रहण प्रक्रियेला आता गती देण्यात आली आहे. वित्त विभागाने इमारतीच्या खरेदीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) शहर अभियंत्यांकडे ₹१,६०१ कोटी निधी हस्तांतरित केला आहे. तर खरेदी कराराचा (विक्रीपत्राचा) मसुदा कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. एआय असेट होल्डिंग कंपनीकडून (AIAHL) अधिग्रहण प्रक्रिया पार पाडल्यानंतर नवीन मंत्रालय एअर इंडिया इमारतीत सुरू होणार आहे.
23 May 2026 01:15 PM (IST)
आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल ८७ पैशांनी महाग झाले आहे तर डिझेलच्या किमतीत ९१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. या महिन्यात दरांमध्ये वाढ होण्याची ही तिसरी वेळ आहे. पण या झटक्यानंतर आता आणखी एक झटका लागला आहे का? गॅस सिलेंडरचे दर वाढले आहेत का? जाणून घेऊयात. पेट्रोल – डिझेलच्या दरांमध्ये तिसऱ्यांना वाढ झाली असताना मात्र एलपीजीच्या बाबतीत ग्राहकांना आजही दिलासा मिळाला आहे; २३ मे २०२६ पर्यंत, भारतातील घरगुती किंवा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज त्यांचे दर स्थिर आहेत. असे असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ऊर्जा संकट आणि भू-राजकीय तणाव कायम आहेत.
23 May 2026 01:02 PM (IST)
राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३५ भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)ने या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह आण्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली.
23 May 2026 12:48 PM (IST)
मावळच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मावळ तालुक्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ मिळणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, पक्षांतर्गत बदल आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.
23 May 2026 12:36 PM (IST)
वनराज आंदेकर खूनानंतर वर्षपुर्तीच्यावेळीच आंदेकर टोळीकडून बदल्याच्या भावनेतून यातील सर्व आरोपींच्या नातेवाईकांना टार्गेट करण्यात आल्याचे समोर आलेले असताना या खूनांचे नियोजनही ‘त्या’ वर्षातच झाल्याचे वास्तव आता समोर येऊ लागले आहे. कारण, आयुष कोमकरच्या खूनापुर्वीच आंदेकर टोळीचा सदस्य आवेज खान हा पुणे पोलिसांच्या रडारवरून लपण्यासाठी उत्तरप्रदेशात जाऊन लपल्याचे समोर आले आहे. अक्षय म्हस्केच्या खूनासाठी तो तीन दिवसांपुर्वीच पुण्यात आला होता, असेही समोर आले आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याचा १ सप्टेंबर २०२४ रोजी सोमनाथ गायकवाड याच्या टोळीकडून खून झाला. या खूनाने शहर तर हादरले होतेच पण आंदेकर टोळी पुर्ण हादरून गेली होती. पण, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरला हा खून जिव्हारी लागला होता. तेव्हाच आंदेकर टोळीकडून मुलाच्या बदल्यात आरोपींचे नातेवाईक टार्गेट करण्यात आले असल्याचे सांगितले जात होते.
23 May 2026 12:24 PM (IST)
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुका काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष यशवंत मोहोळ, माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तळेगाव शहराध्यक्ष विशाल वाळुंज, तालुका संपर्क प्रमुख राजू शिंदे, ज्येष्ठ नेते अॅड. खंडूजी तिकोणे, राजीव फलके, किरण मोकाशी, नितीन माने, सुधीर गायकवाड, युवक अध्यक्ष संदीप सातकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
23 May 2026 12:12 PM (IST)
बाणेर-बालेवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड येथील निवासस्थानी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, नागरिकांना गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा मिळावा, यासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करावे, असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना बजावले.
23 May 2026 12:00 PM (IST)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या रिक्त जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
23 May 2026 11:50 AM (IST)
कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे सोशल मीडिया ग्रुपवरील कमेंटच्या रागातून साहिल काझी या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गाडीच्या कर्जाच्या वादातून हा संघर्ष वाढला. पोलिसांनी आरोपी राजू कांबळेला अटक करून तपास सुरू केला आहे.
23 May 2026 11:40 AM (IST)
२२ मे २०२६ रोजी अमेरिकी सरकारने आपल्या अधिकृत स्थलांतर धोरणात (Immigration Policy) अत्यंत कठोर आणि अभूतपूर्व बदल जाहीर केला आहे. या नवीन नियमांमुळे आता अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर राहणाऱ्या लोकांना तिथे राहूनच थेट आपले स्टेटस बदलून ग्रीन कार्ड मिळवता येणार नाही. उलट, ग्रीन कार्डच्या पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना पहिल्यांदा स्वतःच्या मायदेशी परत जावे लागेल.
23 May 2026 11:40 AM (IST)
मुंबईतील टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर चॅरिटेबल हॉस्पिटल येथे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सीएसआर निधीतून अत्याधुनिक पूर्णपणे स्वयंचलित बायोकेमिस्ट्री ब्लड ॲनालायझर प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे रुग्णांना अधिक जलद, अचूक आणि दर्जेदार निदान सेवा मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
23 May 2026 11:30 AM (IST)
धाराशिवच्या कार्ला गावात सामायिक बोअरवेलच्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये हाणामारी झाली. यात ब्रह्मदेव मोटे यांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. पोलिसांनी मृताच्या भावासह चौघांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
23 May 2026 11:15 AM (IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे पारंपारिक पद्धतीने प्रश्नपत्रिकांचे वितरण आणि उत्तरपत्रिकांची तपासणी करते. मात्र, बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे नियोजन मंडळाने केले आहे. यापूर्वी फेब्रुवारी-मार्च परीक्षेत बारामती येथून डिजीटल ट्रंकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता त्यापुढील टप्पा म्हणून थेट डिजीटल प्रश्नपत्रिका पाठवण्याची यंत्रणा विकसित केली जात आहे.
23 May 2026 11:05 AM (IST)
पृथ्वीवरील सर्वात जुन्या आणि शांत जीवांपैकी एक असलेल्या कासवांच्या संरक्षणासाठी आजचा दिवस म्हणजेच २३ मे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी २३ मे हा दिवस जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) म्हणून साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) टिकवून ठेवण्यात कासवांची भूमिका अनन्यसाधारण आहे. परंतु, दुर्दैवाने आधुनिक मानवाच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर राज्य करणारे हे जीव आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
23 May 2026 11:00 AM (IST)
भारतात प्रत्येकवेळी लोकांना ट्रॅफिकच्या समस्येचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकमध्ये वैतागलेल्या लोकांसाठी ऑटोमॅटिक कारचा पर्याय नेहमीच फायद्याचा आणि आरामदायक ठरू शकतो. कारण मॅन्युअल कार्सप्रमाणे ऑटोमॅटिक कारमध्ये वारंवार क्लच दाबण्याची आणि गिअर बदलण्याची कटकट नसते. ऑटोमॅटिक कार चालवण्याची पद्धत मॅन्युअल गाडीपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे ऑटोमॅटिक कार चालवताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेच लोकं ड्रायव्हिंगदरम्यान काही अशा चूका करतात, ज्यामुळे गियरबॉक्स खराब होतो आणि गाडीचे नुकसान होऊ शकते. ऑटोमॅटिक कार चालवाताना खालील चुका टाळा.
23 May 2026 10:50 AM (IST)
धाराशिव येथून एक हत्येची बातमी समोर आली आहे. सुक्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याचे समोर आले आहे. शेतातील सामाजिक बोरवेलच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला होता. याच वादातून हत्या करण्यात आल्याच्या समोर आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडालेली आहे. घडलेली घटना धारेश्वर जिल्ह्यातील कार्ला येथील आहे.
23 May 2026 10:40 AM (IST)
पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेची गोपनीय प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये प्रश्नपत्रिका डिजिटल पद्धतीने थेट केंद्रावर पाठवणे आणि उत्तरपत्रिकांचे ऑनलाईन स्क्रिनवर मुल्यांकन केले जाणार आहे. येत्या जुन-जुलै महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करण्यात येणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार असून फक्त एका केंद्रासाठीच मर्यादित असेल. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तरच पुढील परीक्षांना ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
23 May 2026 10:30 AM (IST)
पृथ्वीवरील सर्वात जुन्या आणि शांत जीवांपैकी एक असलेल्या कासवांच्या संरक्षणासाठी आजचा दिवस म्हणजेच २३ मे हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी २३ मे हा दिवस जगभरात ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) म्हणून साजरा केला जातो. निसर्गाची अन्नसाखळी आणि सागरी परिसंस्था (Marine Ecosystem) टिकवून ठेवण्यात कासवांची भूमिका अनन्यसाधारण आहे. परंतु, दुर्दैवाने आधुनिक मानवाच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोट्यवधी वर्षांपासून पृथ्वीवर राज्य करणारे हे जीव आज स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
23 May 2026 10:20 AM (IST)
रत्नागिरी येथून एक धक्कादाय घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याची घटना समोर आली. हत्या झालेल्या तरुणाचे वार केल्यानंतर चे व्हिडिओ देखील वायरल झाले आहेत. एवढेच नाही तर त्याने आपल्या अखेरच्या श्वासात आरोपींची देखील नावे सांगितली आहेत. घडलेली घटना ही रत्नागिरी शहरा नजीकच्या कुमार भाव साईनगर येथील सात बंगल्याच्या मागे गुरुवारी रात्री साडेनऊ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
23 May 2026 10:10 AM (IST)
तालुक्याच्या पश्चिम भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह कण्हेरीच्या डोंगरावर ढगफुटीसदृश्य पावसामुळे ओढ्यांना पूर आला. तासभर झालेल्या पावसाने वीटभट्टी मालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, अतिट येथे वीज पडून एका गायीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
23 May 2026 10:00 AM (IST)
FYJC Admission: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (FYJC Admission) नियमित फेरीत सलग दुसऱ्या दिवशीही मोठा तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला. संकेतस्थळ (वेबसाईट) वारंवार हँग होणे आणि लॉगिन केल्यानंतर भरलेला डेटा गायब होणे, अशा गंभीर तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. या वाढत्या त्रासाची गंभीर दखल घेत अखेर शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
वेबसाईटवरील तांत्रिक त्रुटींमुळे कोणाचेही नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे, अर्जाचा भाग-१ भरणे आणि अर्जाचा भाग-२ (महाविद्यालयांचे प्राधान्यक्रम - College Options) लॉक करण्यासाठी सोमवार, २५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नवीन मुदतवाढ देण्यात आली आहे. या वाढीव मुदतीमुळे तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आपला अर्ज अचूक भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
23 May 2026 09:55 AM (IST)
Rajya Sabha By -Election: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या रिक्त जागेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
23 May 2026 09:50 AM (IST)
Pune Congress: पुण्यातील काँग्रेस पक्ष संघटनेत सध्या शहराध्यक्ष पदावरून मानापमानाचे राजकारण रंगताना दिसत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने काँग्रेसने पुणे शहरासाठी दोन स्वतंत्र शहराध्यक्षांची नियुक्ती केली असली, तरी या नव्या प्रयोगामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी उफाळून आली आहे.
पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयानुसार, पुणे शहराच्या पश्चिम भागासाठी माजी आमदार दीप्ती चौधरी यांची, तर पूर्व भागासाठी प्रशांत जगताप यांची शहराध्यक्ष म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. पक्षाची वाढ करणे आणि स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट करणे हा या दुहेरी नियुक्तीमागील मुख्य हेतू असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.






