Maharashtra Breaking News Updates Today
Siddaramaiah resignation rumors News: गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच कर्नाटकमधील नेतृत्त्व बदलाचा विषय शांततेच्या मार्गाने सोडवण्यात काँग्रेस हायकमांडला यश आले आहे. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल या सर्व चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगत असले, तरी पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आज सकाळी ११ वाजता राज्यपाल थावरचंद गहलोत यांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती दिली जात आहे.
28 May 2026 05:20 PM (IST)
अभिनेत्री शमिता शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एखाद्या सेलिब्रिटीसाठी Troll होणे, ही काही नवीन गोष्ट नाही. प्रसिद्धी हवी आहे तर या गोष्टींना सामोरे जावेच लागते. Troll करणाऱ्यांना विषयांची गरज नसते, ते अगदी सेलेब्रिटीच्या वयाने, दिसण्याने, चालण्या-बोलण्याने अगदी त्यांच्या Martial Status वरूनही त्यांना ट्रोल करत असतात. असेच काही अभिनेत्री शमिता शेट्टीसोबत घडले आहे. परंतु, या मुद्द्यात तिने Troller ला सडेतोड उत्तर दिले आहे. इतकेच नव्हे तर Trolling करणाऱ्या व्यक्तीचे नावही जाहीर केले आहे.
28 May 2026 05:10 PM (IST)
उन्हाळ्याच्या दिवसात उन्हात उभी असलेली कार अगदी काहीच मिनिटात तापलेल्या भट्टीसारखी गरम होते. खासकरून ग्लास रुफ आणि पॅनोरमिक सनरुफ असलेल्या कारमध्ये गाडी लवकर आणि जास्त गरम होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. आता टेस्लाने या समस्येवर एक नवीन उपाय शोधून काढण्याचा प्रयत्न केलं आहे. रिपोर्ट्सनुसार एका खास Cooling Technology चा पेटेंट कंपनीने आपल्या नावे करून घेतला आहे, जो Glass Roof च्या माध्यमाने केबिनला थंड ठेवण्यासाठी मदत करतो.
28 May 2026 05:00 PM (IST)
Pune LPG Cylinder Fraud Viral Video : एकीकडे अमेरिका इराण युद्ध पेटले आहे, ज्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनी बंद होऊन जागतिक बाजारपेठेत इंधन आणि उर्जा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे संपूर्ण जगावर इंधन आणि उर्जा संकट निर्माण झाले आहे. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहे. तसेच व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरही महागले आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचे फटके बसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जय भवानी जनता वसाहतीत एका घरगुती LPG सिलेंडरमधून गॅसऐवजी चक्का पाणी आढळ्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
28 May 2026 04:59 PM (IST)
वसई-विरार शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरभर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून प्रमुख चौक, मशिदी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर सेलही सतर्क ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
28 May 2026 04:53 PM (IST)
दापोली तालुक्यातील हर्णे येथील कनकदुर्ग किल्ला परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्णे येथील बाजारपेठ मोहल्ल्यातील २ ते ३ युवक कनकदुर्ग किल्ला परिसरात धूम्रपान व मद्यपान करत असल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये सुरू झालेला वाद पुढे दोन समाजांतील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाल्याची माहिती समोर येत आहे.
हा वाद 26 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास झाला होता. मात्र, याच घटनेचा राग मनात धरून 27 मे रोजी संध्याकाळी ज्या युवकांनी धूम्रपान करण्यास विरोध केला होता त्या चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर 25 ते 30 युवकांच्या समूहाने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
28 May 2026 04:42 PM (IST)
लग्नाच्या आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याची घटना अनेकदा समोर आली आहे. आता दोन महिलांनी लग्नाच्या आमिष दाखवून एका व्यवसायाची फसवणूक केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तब्बल ५५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत राहणाऱ्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत काम करत असल्याचे सांगत तिने व्यावसायिकाशी जवळीक वाढवली. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख निर्माण करण्यात आली आणि त्यानंतर विश्वास संपादन करण्यात आला.
28 May 2026 04:36 PM (IST)
मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल अजहा अर्थात बकरी ईद आज भिवंडी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी शहरातील विविध मशिदींमध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात आली.तर शेवटची नमाज कोटरगेट मज्जीद मध्ये पठण करण्यात आली.नमाजसाठी शेकडो नागरिक उपस्थित होते. नमाजानंतर नागरिकांनी एकमेकांना गळाभेट देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा दिल्या. सणानिमित्त शहरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
28 May 2026 04:27 PM (IST)
बकरी ईद... ज्याला 'बलिदानाचा सण' असंही म्हटलं जातं. जगभरातील मुस्लिम बांधव हा सण मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा करतात. या सणाची पाळंमुळं थेट प्रेषित हजरत इब्राहिम यांच्या काळाशी जोडलेली आहेत. अल्लाहवरील अथांग प्रेम आणि सर्वोच्च त्यागाची ही कहाणी आहे." इस्लाम धर्मात रमजान ईदइतकाच 'बकरी ईद' म्हणजेच 'ईद-उल-अजहा' या सणाला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. हा सण केवळ एका परंपरेचा भाग नाही, तर तो आहे सर्वोच्च त्याग, समर्पण आणि विश्वासाचं प्रतीक! पण ही ईद का साजरी केली जाते? यामागचा खरा इतिहास आणि मुख्य कारण काय? याच संदर्भात सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी पोपट पिटेकर यांनी सय्यद वाहब यांच्याशी खास बातचीत केलीये.
28 May 2026 04:14 PM (IST)
बदलापूर मधून एक मोठी बातमी... भाजप आमदार किसन कथोरे यांचं व्हाट्सअप हॅक झालय. महत्त्वाचं म्हणजे या हॅकर्सनी त्यांच्या मोबाईल मधील सर्व नंबरवर मेसेज पाठवून आमदार कथोरेंच्या नावाने 55 हजारांची मागणी केलीय. याप्रकरणी कथोरे यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल करून हॅकर्सवर कारवाईची मागणी केलीय. आमदार कथोरे यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हाट्सअप हॅक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली असून पैशांच्या मागणी संदर्भात मेसेज आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन केलंय.
28 May 2026 04:04 PM (IST)
आयपीएलमधील बेटिंगचा ‘राजस्थान’ कनेक्शनच्या संदर्भाने सध्या तपास केला जात आहे. बेटिंग प्रकरणी कोल्हापुरात आतापर्यंत दहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातच भाजप नगरसेवक नीतेश पवार याचा समावेश आहे
28 May 2026 03:55 PM (IST)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यानंतर आता डी.के. शिवकुमार हेच राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनतील असे निश्चितपणे मानले जात आहे.
28 May 2026 03:50 PM (IST)
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या लोकांनी सातत्याने केलेल्या छळामुळे एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरून आणि माहेरहून ५० तोळे सोने आणण्यासाठी तिचा अनेक वर्षांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरु होता. आता तिचा तामिळनाडू राज्यातील नागापट्टीनम येथे संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाचा संपूर्ण प्रकरण
28 May 2026 03:45 PM (IST)
राज्यातील शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्ली येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत मोठे निर्णय घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर
28 May 2026 03:40 PM (IST)
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिविटी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने मेट्रो लाईन ५ हा महत्त्वाचा प्रकल्प आता नव्या टप्प्यात दाखल झाला आहे. विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गिकेची एकूण लांबी आता ३४.२१ किमी झाली असून ती एमएमआरमधील सर्वात मोठ्या मेट्रो मार्गिकांपैकी एक ठरणार आहे. त्याच वेळी, या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता ‘CMRS’ तपासणीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे. वाचा सविस्तर
28 May 2026 03:35 PM (IST)
इस्रायलच्या लेबनॉनमधील हल्ल्यानंतर हिजबुल्लाहने संताप व्यक्त केला आहे. हिजबुल्लाहने दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायल सैन्यावर हल्ले केले आहे. मरजायून जिल्ह्यातील 'अल-कुसैर' भागात तैनात असलेल्या इस्रायलच्या लष्करी ताफ्यावर रॉकेट्स डागण्यात आले आहेत. तसेच इस्रायच्या चिलखती वाहनांचे एक गुप्त नियंत्रण केंद्रलाही लक्ष्य करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
28 May 2026 03:30 PM (IST)
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दुशिंगपूर शिवारात भरधाव इलेक्ट्रिक कारने दुपारी पेट घेतला. धावत्या कारमधून अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ बाहेर उडी घेतली. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढा घातला. त्यात कार पूर्णपणे जळून जळून खाक झाली होती. जाणून घ्या संपूर्ण घटना
28 May 2026 03:25 PM (IST)
China Expressway Accident: चीनमध्ये भीषण अपघात घडला आहे. एका प्रवासी व्हॅनची ट्रेलर ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताच थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे.
A three-vehicle crash on Shenzhen’s Nanping Expressway triggered a car fire that spread to a roadside sound barrier canopy on Tuesday afternoon. No injuries or people trapped were reported, and the fire has since been extinguished. pic.twitter.com/EwU6kl7kVq
— Shanghai Daily (@shanghaidaily) May 27, 2026
28 May 2026 03:20 PM (IST)
प्रख्यात उर्दू कवी आणि 'पद्मश्री' पुरस्कार विजेते डॉ. बशीर बद्र यांचे निधन झाले आहे. दीर्घकालीन आजारानंतर आज, २८ मे २०२६ रोजी (वय ९१) भोपाळ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
28 May 2026 03:15 PM (IST)
पुणे: पुणे शहरातून आत्महत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर तरुणीने मुठा नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीने मृत्यूपूर्वी आपल्या भावाला मेसेज केला होता. या मेसेजमध्ये केलेल्या आरोपांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. वाचा संपूर्ण प्रकरण
28 May 2026 03:10 PM (IST)
Petrol Diesel Shortage News In Marathi : पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा केवळ सोशल मीडियावरच चर्चेत नाही, तर वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांवरही गाजत आहे. गोरखपूर, देवरिया, रत्नागिरी, भावनगर, महाराजगंज किंवा डिंगूरपूर येथील असो, एचपीसीएलने (HPCL) आपल्या ‘एक्स’ हँडलवरून तुटवड्याचे प्रत्येक वृत्त पूर्णपणे नाकारले आहे. तेल विपणन कंपन्या मुबलक पुरवठ्याचा दावा करत असल्या तरी, वास्तव मात्र स्पष्ट नाही. इतकेच नाही, तर देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही असा दावा सरकारही करत आहे, पण प्रश्न असा निर्माण होतो की, काही पंपांवर ‘डिझेल नाही’ आणि इतरांवर ‘पेट्रोल नाही’ असे फलक का आहेत? पंपांवर रांगा का लागल्या आहेत? वाचा सविस्तर
28 May 2026 03:05 PM (IST)
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या सतरा जागांमध्ये जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही मित्रपक्षांमध्ये आलबेल नसल्याचे दिसत आहे. अश्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवार, २८ मे) नवी दिल्ली येथे भेट घेतली. राज्याच्या विकासावर यावेळी चर्चा करण्यात आली असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील नवी दिल्लीत तळ ठोकून आहेत. याशिवाय राज्यातील इतर मंत्रीसुद्धा नवी दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे. म्हणूनच ‘विधान परिषदेतील जागावाटपावरील वाद’ याविषयावर हि भेट झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाचा सविस्तर
28 May 2026 03:02 PM (IST)
वसई-विरार शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन अलर्ट मोडवर आले असून शहरभर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून प्रमुख चौक, मशिदी परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अफवा, आक्षेपार्ह पोस्ट किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर पोलिसांची विशेष नजर असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर सेलही सतर्क ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
28 May 2026 02:59 PM (IST)
भाईंदर : काशिमीरा परिसरातील मुंबई-अहमदाबाद पश्चिम द्रुतगती महामार्गावर गुरुवारी पहाटे सुमारे साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की धडकेनंतर कारचा अक्षरशः चुराडा झाला. वाहनाचे इंजिन रस्त्यावर फेकले गेले होते. अपघातानंतर महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ महामार्गालगत असलेल्या ऑर्बिट रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
28 May 2026 02:53 PM (IST)
मिरा रोड : मिरा रोड येथील पूनम इस्टेट क्लस्टर-१ गृहसंकुलात कुर्बानीसाठी बकरे ठेवण्यावरून गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेला वाद अखेर शांत झाल्याचे चित्र बकरी ईदच्या दिवशी पाहायला मिळाले. सोमवार आणि मंगळवारी या परिसरातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले होते. मात्र, सोसायटीतील तब्बल ५१ बकऱ्यांना महानगरपालिकेने निश्चित केलेल्या पर्यायी ठिकाणी हलविल्यानंतर परिस्थिती निवळली असून आज संपूर्ण परिसरात शांततेचे वातावरण होते.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने शहरभर कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. विशेषतः पूनम इस्टेट परिसरात कालपासूनच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सुमारे ५५० पोलीस कर्मचारी आजच्या बंदोबस्तात कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
वादाच्या पार्श्वभूमीवरही पूनम इस्टेटमधील नागरिकांनी एकात्मतेचा संदेश दिला. सोसायटीतील अनेक मुस्लिम बांधवांनी बाहेरील काही व्यक्तींमुळे सोसायटीची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत, आजही सोसायटीत सर्व धर्मीय नागरिक एकोप्याने राहत असल्याचे स्पष्ट केले. येथे सर्व सण एकत्रितपणे साजरे केले जातात आणि कोणत्याही सदस्यामध्ये कटुता नसल्याचे रहिवाशांनी सांगितले.
28 May 2026 02:49 PM (IST)
पत्री पूल परिसरात रस्त्यावर ट्रक बंद पडल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. बंद पडलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने काढण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे
28 May 2026 02:42 PM (IST)
अहिल्यानगर येथील ऐतिहासिक इदगा मैदानावर आज बकरी ईद अत्यंत उत्साहात आणि पवित्र वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहर आणि परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत विशेष नमाज पठण केले. यावेळी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात सुख, शांती आणि समृद्धी लाभो, अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि विकासाची प्रार्थना यावेळी करण्यात आली… इदगा मैदानावर नमाज आदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या पवित्र प्रसंगी 'अहिल्यानगरमध्ये कायम सुख-शांती नांदो, हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने आणि बंधुभावाने एकत्र राहो,' अशी देवाकडे प्रार्थना करण्यात आली. तसेच, आगामी काळात नगर जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा आणि सर्वांना प्रगतीची दारे खुली व्हावीत, अशी भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. नमाज पठणानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी इदगा मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
28 May 2026 02:36 PM (IST)
मालवण आणि ऐतिहासिक 'किल्ले सिंधुदुर्ग'च्या पर्यटकांनी यावर्षी मोठी पसंती दिली आहे. २६ जून पासून संपलेला मालवणचा यंदाचा पर्यटन हंगाम स्थानिक व्यावसायिक आणि जिल्ह्यासाठी कमालीचा फायदेशीर ठरला आहे. यंदा तब्बल ५ लाखांहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अद्भूत जलदुर्गाचे दर्शन घेतले. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आदेशानुसार, पावसाळ्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन २६ मे पासून मालवणची प्रसिद्ध सागरी जलपर्यटन, व्यावसायिक वॉटर स्पोर्ट्स आणि किल्ले प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा बंदी आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत लागू राहणार असून आता नवा पर्यटन हंगाम १ सप्टेंबर २०२६ पासून पुन्हा नव्या जोमाने सुरू होईल.
28 May 2026 02:25 PM (IST)
नेरळ येथे श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे. 17व्या वर्षी हे आयोजन करण्यात आले असून या आध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबिराला 30 बालके वारकरी शिक्षण घेत आहेत.दरम्यान या 15 दिवसीय निवासी बालसंस्कार शिबिराचे निमित्ताने नेरळ येथे रंगतोय भव्य कीर्तन महोत्सव देखील आयोजित केला आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ येथे श्री संत ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था यांच्या वतीने आयोजित १६ वा भव्य कीर्तन महोत्सव सोहळा आणि अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीर सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. १५ मे पासून आध्यात्मिक बालसंस्कार शिबिर सुरू झाले असून याच शिबिरात २५ मे पासून सात दिवसांचे कीर्तन महोत्सव रंगणार आहे.एक जून रोजी काल्याचे कीर्तन होऊन आध्यात्मिक शिबिराची सांगता होणार आहे. 'अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीर' जोमाने सुरू आहे. या शिबिरामध्ये सध्या ३० मुले वारकरी संप्रदायाचे व पारमार्थिक ज्ञान आत्मसात करत आहेत. यामध्ये मुलांना विविध वाद्ये वाजवणे (मृदंग, टाळ), शास्त्रशुद्ध गायन आणि अध्यात्मिक संस्कारांचे मोलाचे धडे दिले जात आहेत. नव्या पिढीला संस्कृतीशी जोडणारा हा उपक्रम यंदाच्या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य ठरला आहे. गेली 16 वर्षे ही शिबिर अखंडितपणे सुरू असून आध्यात्मिक शिबिरात निवासी शिक्षण घेण्याची परंपरा कायम आहे.
28 May 2026 02:13 PM (IST)
बकरीईदचा निमित्ताने ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात ईदगावर मुस्लिम समाजातील लोक नमाज पठण करतात याचवेळी या परिसरातील दुर्गादेवीच्या मंदिरात हिंदू भाविकांना प्रवेश बंदी असते. ही प्रवेश बंदी का हिंदूंवर अन्याय का असा सवाल करत गेल्या 40 वर्षापासून शिवसेना बगरीईदच्या दिवशी मंदिरात प्रवेश करण्यासाठी घंटानाद आंदोलन करते यंदा भाजप देखील आक्रमक झाली होती आम्हाला मंदिरात प्रवेश दिला नाही तर आम्ही हनुमान चालीसा आणि दुर्गा शोच्या पठण करू असा इशारा दिला होता त्या अनुषंगाने कल्याण मध्ये एका प्रकारे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आज बकरी ईदचा निमित्ताने पहाटे पाच वाजल्यापासून दुर्गाडी किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अपर पोलीस आयुक्त संजय जाधव डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती दोन ते तीन रस्ते बंद करण्यात आले होते एकीकडे दुर्गाडी किल्ला परिसरात ईदगावर नमाज पठण सुरू होते तर दुसरीकडे लालचौकी परिसरात शिवसेना शिंदे गट ठाकरे गट हिंदूवादी संघटनाच्या पदाधिकाऱ्याने आंदोलन केलं पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दुर्गाडी किल्ला परिसरात जाण्याच्या प्रयत्न केला मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना लालचौकी परिसरात थांबवले आहे कोणत्याही अनुचित प्रकार होऊ नये पोलिसांनी कडे कोड बंदोबस्त केले
28 May 2026 02:04 PM (IST)
हिंगोलीतून आरोग्य व्यवस्थेला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येतेय.रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे एका आईनं आपलं नवजात बाळ गमावलंय. वसमत तालुक्यातील मनीषा इंगळे नावाच्या महिलेला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानृं डॉक्टरांनी तिला हिंगोलीला हलवण्यास सांगितलं. नातेवाईकांनी तातडीनं 102 आणि 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र गाडीत डिझेल नाही असं सांगून रुग्णवाहिका नाकारण्यात आली. गरोदर मातेला तब्बल दीड तास ताटकळत ठेवण्यात आलं. अखेर नातेवाईकांनी स्वतः पैसे खर्च करून खासगी गाडी केली. मात्र हिंगोलीत पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. प्रसूती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला.
28 May 2026 02:00 PM (IST)
NEET UG 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकड़ून (NTA) नीट युजी २०२६ परीक्षेचे शुल्क परत मिळण्याच्या अंतिम तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. ३ मे रोजी झालेली नीट युजी परीक्षा रद्द झाल्यानंतर एजन्सीने विद्यार्थ्यांना त्यांची फी परत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपली माहिती, बँक तपशील २२ जून २०२६ या अंतिम तारखेपर्यंत द्यावेत. यासाठी नीट युजी २०२६ फी रिफंडेबल पोर्टल २२ मे पासून खुले करण्यात आले आहे.
28 May 2026 01:55 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (28 मे 2026) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे सांगताना त्यांनी सरकारला इशारा दिला. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास 30 तारखेपासून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
28 May 2026 01:50 PM (IST)
पुणे जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि म्हाडा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पण आढाळराव पाटील यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाला पुणे शिवसेनेतीलच काही प्रभावी नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे हा प्रवेश सध्या लांबणीवर पडल्याचेही बोलले जात आहे.
28 May 2026 01:45 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी उचललेल्या एका पावलामुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये मोठा अंतर्गत भूकंप झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम जगतातील महत्त्वाचे देश असलेल्या सौदी अरेबिया आणि पाकिस्तानला इस्रायलसोबतच्या ‘अब्राहम करारा’त (Abraham Accords) समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली.
28 May 2026 01:40 PM (IST)
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंध होते. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्रश्न करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
28 May 2026 01:25 PM (IST)
तुम्हाला ‘सेल्फी मैंने लेली आज…’ हे गाणे आठवत असेलच. तुम्ही कदाचित अजूनही असे गाणे विसरू शकत नसाल. अनेक वर्षांपूर्वी, ढिंचक पूजा हे गाणे गाऊन रातोरात स्टार बनली होती. जो कोणी ढिंचक पूजाचे गाणे ऐकायचा, त्याच्या कानातून रक्त येऊ लागायचे. परिस्थिती इतकी वाईट होती की लोक सोशल मीडियावर रोज ढिंचक पूजाला शिव्या देत असत. या गाण्याने धुमाकूळ घातल्यानंतर, ढिंचक पूजाने आणखी बरीच गाणी गायली, पण तिला तशी प्रसिद्धी मिळाली नाही. दरम्यान, ढिंचक पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. असे म्हटले जात आहे की ढिंचक पूजाने रातोरात लग्न केले आहे.
28 May 2026 01:15 PM (IST)
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांनी PIT NDPS कायद्यान्वये मोठी कारवाई करत सराईत आरोपी राजन बाळा राठोड याला पुणे येथील येरवडा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आलेली ही पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली “नशामुक्त भारत २०२८” अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
28 May 2026 01:05 PM (IST)
अमेरिका इराण संघर्षाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गुरुवारी(२८ मे) पहाटेच्या सुमारास अब्बास बंदरावर झालेल्या दुसऱ्या हल्ल्यानंतर इराण पेटून उठला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केला आहे. यामुळे मध्यपूर्वेत पुन्हा अशांतता पसरली आहे. तसेच शांतता चर्चा अपयशी होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.
28 May 2026 01:00 PM (IST)
देशभरातील लाखो तरुण-तरुणी एक स्वप्न पाहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरु करतात. यूपीएससीच्या सर्व परीक्षांमध्ये नागरी सेवा परीक्षा महत्त्वाची मानली जाते. देशात गेल्या रविवारी (२४ मे २०२६) रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची ‘नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६’ पार पडली. या परीक्षेत दोन पेपर असतात. या दोन्ही परिक्षेच्या उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना उत्तरांबद्दल त्रुटी आहेत, त्यांचे आक्षेप ते upsconline.nic.in/login या संकेतस्थळावर नोंदवू शकतात. दुसरीकडे यूपीएससीच्या अध्यक्षांनीही यंदाचा पेपर कठिण असल्याचे मान्य केले आहे. चला तर मग जाणून घेऊया, यूपीएससीचे अध्यक्ष डॉ अजय कुमार नेमके काय म्हणाले?
28 May 2026 12:55 PM (IST)
आंतरराष्ट्रीय राजकारणात सध्या अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी उचललेल्या एका पावलामुळे शेजारील देश पाकिस्तानमध्ये मोठा अंतर्गत भूकंप झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मुस्लिम जगतातील महत्त्वाचे देश असलेल्या सौदी अरेबिया आणि पाकिस्तानला इस्रायलसोबतच्या ‘अब्राहम करारा’त (Abraham Accords) समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. ट्रम्प यांच्या या एका विधानाने पाकिस्तानातील जिहादी आणि कट्टरपंथी संघटनांचा थरकाप उडाला असून, जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटनांपैकी एक असलेल्या लश्कर-ए-तोयबाने (LeT) थेट देशाचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि शक्तिशाली लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याविरुद्ध उघडपणे युद्धाची घोषणा केली आहे.
28 May 2026 12:50 PM (IST)
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज (28 मे 2026) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे सांगताना त्यांनी सरकारला इशारा दिला. मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्यास 30 तारखेपासून पुन्हा आंदोलन उभारण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधत आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा सुरू असल्याचा आरोप केला आहे.
28 May 2026 12:45 PM (IST)
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यातील वेदनादायक शेवटच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूजा भट्ट म्हणाली, “परवीन यांचे आयुष्य खूप दुःखद होते. त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्यासोबत जे काही घडले… त्यांची प्रकृती ठीक नव्हती. म्हणजे, मी डॉक्टर नाही, त्यामुळे त्यांना नक्की काय झाले हे मी सांगू शकत नाही, पण त्यांची प्रकृती ठीक नव्हती.”
विकी लालवाणी यांना दिलेल्या एका मुलाखतीत पूजा म्हणाली, “जेव्हा ती परत आली, तेव्हा मला आठवतंय की ती स्टारडस्टच्या ऑफिसमध्ये बसून झेरॉक्स मशीन वापरत होती आणि अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मुलाखती देत होती, की त्यांना अजूनही तिला मारायचं आहे. मला हेही आठवतंय की परवीन फक्त अंडीच खायची, कारण तिला वाटायचं की इंडस्ट्रीने बाकी सर्व गोष्टींमध्ये विष कालवलं आहे.”
28 May 2026 12:40 PM (IST)
शेजारील देश पाकिस्तान सध्या केवळ आर्थिक दिवाळखोरीशीच नाही, तर अत्यंत भीषण अंतर्गत सुरक्षा संकटाशी आणि गुन्हेगारीशी झुंजत आहे. पाकिस्तानचा बलुचिस्तान प्रांत पुन्हा एकदा रक्ताने माखला असून तेथे एका अत्यंत क्रूर घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. हरनाई जिल्ह्यातील शहराग परिसरात दिवसाढवळ्या अज्ञात सशस्त्र दहशतवाद्यांनी किंवा हल्लेखोरांनी मुख्य रस्त्यावर बेकायदेशीर नाकाबंदी केली आणि सामान्य नागरिकांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. या हुकूमशाहीला आणि तपासणीला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला, तेव्हा या क्रूर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करत ५ जणांना जागीच ठार केले. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
28 May 2026 12:35 PM (IST)
मागील काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला होता. अतिशय धोकादायक विषाणू जगभरात पसरल्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा आफ्रिकेतील काँगो, दक्षिण सुदान आणि युगांडा येथे इबोला आजाराचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे भारत सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात कोणलाही इबोलासंबंधित लक्षणे दिसू लागल्यास तातडीने योग्य त्या उपाययोजना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेकडून मुंबईतील सर्व पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांसाठी मार्गदर्शक सूचनासुद्धा जारी करण्यात आल्या आहे. सध्या भारतात इबोलाचा कोणताही रुग्ण नाही, असे सुद्धा सांगण्यात आले आहे. इबोला व्हायरसच्या पार्श्वभूमीवर WHO अलर्ट देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊया आफ्रिकेत पसरलेल्या इबोला आजाराची गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपचार.
28 May 2026 12:30 PM (IST)
बीड: बीड येथून एक नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर साठ वर्षाच्या आजोबांनीच अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर चौकशीत पीडितेच्या चुलत भावाने देखील अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आजोबा आणि चुलत भाऊ यांच्यावर पोक्सो ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटना नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
28 May 2026 12:25 PM (IST)
CNG Price Increase Maharashtra: पुणे आणि नाशिकमधील वाहनचालकांना महागाईचा आणखी एक झटका बसला असून सीएनजी (CNG) गॅसच्या दरात प्रतिकिलो 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज सकाळपासून लागू झाली असून, सार्वजनिक वाहतूक तसेच खासगी वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
दरवाढीनंतर पुण्यात प्रतिकिलो सीएनजीचा दर 94.85 रुपयांवर पोहोचला आहे. नाशिकमध्येही नव्या दरांनुसार सीएनजी महाग झाली असून वाहनचालकांना आता इंधनासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. सीएनजीच्या वाढत्या दरांचा परिणाम रिक्षा, टॅक्सी आणि व्यावसायिक वाहनांवर अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर वाढत असताना वारंवार होणाऱ्या दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. इंधन खर्च वाढल्यास त्याचा परिणाम प्रवासी भाडे आणि मालवाहतूक खर्चावरही होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
28 May 2026 12:20 PM (IST)
भारतात सर्व राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. या तापमानात कारचे टायर लवकर खराब होतात. अनेक लोक टायरचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि प्रवासादरम्यान त्यांचे तापमान कमी ठेवण्यासाठी टायरमध्ये नायट्रोजन वायू भरण्याची शिफारस करतात. टायरमध्ये हा वायू भरल्याने त्यांना फायदा होतो का? जाणून घ्या सविस्तर माहिती…
अनेक पेट्रोल पंप आणि सर्व्हिस सेंटरवर कारच्या टायरमध्ये नायट्रोजन गॅस भरण्याचा सल्ला दिला जातो. दावा असा केला जातो की नायट्रोजनमुळे टायर थंड राहतात, हवा कमी निघते आणि त्यामुळे कारचे मायलेज वाढते. मात्र, या दाव्यामागचे सत्य काय आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, नायट्रोजन गॅसमध्ये ओलावा कमी असतो आणि तिचा दाब (Pressure) सामान्य हवेपेक्षा अधिक स्थिर राहतो. त्यामुळे टायरमधील प्रेशर जास्त काळ कायम राहण्यास मदत होऊ शकते. योग्य टायर प्रेशर असल्यास वाहनाचे इंधन कार्यक्षमतेने वापरले जाते, ज्याचा थोडाफार सकारात्मक परिणाम मायलेजवर दिसू शकतो.
28 May 2026 12:15 PM (IST)
मुंबईतील रस्ते दुभाजक, पदपथ दुरुस्ती, दगडी कडा बसवणे यांसारखी दैनंदिन व लहान-मोठी देखभाल-दुरुस्तीची कामे कंत्राटदारांना न देता पालिकेच्या स्वतःच्या मनुष्यबळाचा वापर करूनच पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. या कामांसाठी कंत्राटदारांवरील अवलंबित्व कमी करून पालिकेच्या आस्थापनेवरील कामगारांचा अधिक प्रभावी व कार्यक्षम वापर करावा, असेही त्यांनी बजावले आहे. महापालिकेच्या परिरक्षण चौक्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध असतानाही, अभियंत्यांकडून योग्य पर्यवेक्षण होत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी अंधेरी आणि विलेपार्ले परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, कीटकनाशक आणि परिरक्षण चौक्यांना अचानक भेटी देऊन पाहणी केली.
28 May 2026 12:10 PM (IST)
गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी करत खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, इम्तियाज नदाफ, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, तुषार बैले, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊदखान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सर्फराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सर्फराज बागवान, सोहिल मुल्ला आदीसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते.
28 May 2026 12:00 PM (IST)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. बंगळूरु येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्र्यांसोबत नाश्त्याच्या बैठकीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी मंत्र्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली. दुपारी ३ वाजता, सिद्धरामय्या राज्यपालांच्या कार्यालयात आपला राजीनामा सादर करण्यासाठी लोक भवनाकडे रवाना होतील. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत सध्या बंगळूरुमध्ये आहेत. ते सध्या मध्य प्रदेशातील इंदूर येथे आहेत. त्यांचे एक नातेवाईक आजारी असून, त्यांची विचारपूस करण्यासाठी ते येथे आले असल्याचे वृत्त आहे.






