सिंधुदुर्गात भीषण अपघात! भरधाव बस आणि रिक्षाचा चक्काचूर; चौघांचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्गमध्ये भीषण अपघात घडला असून बस आणि रिक्षाच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक प्रवासी जखमी जखमी झाला आहे. त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे ही भीषण दुर्घटना घडली.
‘Air India’ च्या अडचणी संपेनातच! कधी तांत्रिक बिघाड तर कधी…; पुणे-दिल्ली फ्लाईटमध्ये नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, विजयदुर्ग मालवण येथून एसटी बस प्रवाशांना घेऊन जात होती. दरम्यान देवगड तालुक्यातील नारिंगरे येथे समोरुन येणाऱ्या रिक्षाचालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि थेट बसला धडक दिली. बसही भरधाव होती. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा पार चक्काचूर झाला, तर बसच्या समोरील भागाचंही मोठं नुकसान झालं आहे.
मोठी बातमी! आषाढी वारीचा उत्साह असताना पंढरपुरात दुर्दैवी घटना; चंद्रभागेत तरुणाचा बुडून मृत्यू
बस आणि रिक्षा धडकेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर एक प्रवासी थोडक्यात बचावला आहे मात्र तो गंभीर जखमी असून त्याला तातडीने रुग्णालयता दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी मध्य धुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतलं. तसंच पुढील तपासणी सुरू केली आहे.