वाशीम : समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हापासून तिथे होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत आहे. दिवसागणिक येथे अपघात होत असतात. प्रशासनाकडून उपाययोजन करण्यात येत असुनसुद्धा या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अद्यापही सुरुच आहे. मंगळवारी शिर्डीहून (Shirdi) साईबाबांचे (Saibaba) दर्शन घेऊन परत येणाऱ्या चंद्रपूरच्या (Chandrapur) भाविकांचा अपघात झाला. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
[read_also content=”देशात वाढतोय कोरोना? 24 तासांत 600 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद; दोन जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/2-people-died-and-more-than-600-found-corona-positive-in-india-in-last-24-hours-nrps-492563.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी हा अपघात घडला. चंद्रपूरहून काही जण शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परत येताना समृद्धी महामार्गवर त्यांच्या कारच अपघात झाला. अचानक रस्त्यत निलगाय आल्याने गाडीवर नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर इथं हलवण्यात आले आहे.