कल्याण : बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे गाळा नावावर गेल्या प्रकरणी सात ९ जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे आरोपीमध्ये केडीएमसीचे अधिकारी आणि रजिस्ट्रेशन कार्यालयाचे अधिकारी यांचा समावेश आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तक्रारदार विक्रम बनकर यांनी आरोप केला आहे की, आपसात संगनमत करुन विक्रम यांचे आजोबा यांच्या नावे असलेला गाळा चंद्रकांत नामदेव बनकर यांच्या नावे बनावट कुलमुखत्यार पत्र अनोंदणीकृत नोटरी करुन अरुण नामदेव पवार आणि मनिषा पवार यांच्या नावे बेकायदेशीरपणे केला आहे. तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कराधान विषयानुसार मालमत्ता कर हस्तांतरण करीता सदर केलली खरेदी विक्री कुळ मुखत्यार पत्र, बक्षीस पत्र हे दस्ताऐवज सरकारचे मुद्रांक शुल्क न भरलेले हस्तांतरणाकरीता वैध ठरत नाहीत. हे माहिती असून कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मालमत्ता हस्तांतरणाचा योग्य तो कायदेशीर वापर करत नाही.
चुकीचा बेकायदेशीर वापर करुन कायदेशीर हस्तांतरण केल्याचे दाखवून त्यासाठी लागणारे सर्व खोटे दस्ताऐवज तयार केले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी अरुण नामदेव पवार आणि मनिषा अरुण पवार यांच्या नावे ड प्रभागातून २००१ पासून खोटी टॅक्स पावती तयार करुन फिर्यादीची फसवणूक केली आहे. या प्रकरणी चंद्रकांत बनकर, अरुण नामदेव पवार, मनिषा अरुण पवार, दुय्यम निबंधक पी. एस. केळकर, प्रभाग अधिकारी शांतीलाल राठोड, अधीक्षक वसंत भोंगाडे, लिपीक हनमुंत यादव, क्लस्टर विभाग लिपीक दिनेश वाघचौडे, सुकेत शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.