धाराशिव : तलवार बाळगणाऱ्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या तरुणाविरुध्द धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद (Crime News) करण्यात आला आहे. हा तरूण पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे उघड व फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करत धाराशिव शहरातील सांजा चौकात आले असता पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुरज उर्फ गुद्या दिलीप इंगळे (रा. गावसुद रोड, तुळजापूर नाका, धाराशिव) हा राहत्या घरामध्ये त्याच्या ताब्यात बेकायदेशीररित्या एक लोखंडी तलवार बाळगून आहे. याची माहिती मिळताच पथकाने छापा टाकून एकास ताब्यात घेतले.
सुरज उर्फ गुद्या दिलीप इंगळे याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातील लोखंडी तलवार जप्त केली. पथकाने त्यास अटक करुन त्याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे आदींनी केली.