मुंबई : राजधानी दिल्लीनंतर (Delhi Pollution) आता महाराष्ट्रातील हवा प्रदूषाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रविवारी मुंबईची हवा खराब या श्रेणीत मोजण्यात आली. यावरुन आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबईत प्रदूषणाचा (Mumbai Pollution) प्रश्न निर्माण झालाय मात्र, मुख्यमंत्र्यांना याची चिंता नाही, मुंबईच्या प्रदूषणावर महाराष्ट्र सरकार गप्प आहे. प्रदूषणाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. यावर योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे. असं ते म्हणाले.
[read_also content=”चंद्रकांत पाटीलाबाबत चिथावणीखोर भाषण देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 14 कार्यकर्त्यांवर गुन्हा https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/case-against-14-activists-of-ncp-who-gave-provocative-speech-about-chandrakant-patil-352567.html”]
सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (SAFAR)-भारतानुसार, मुंबई, महाराष्ट्रातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत आहे. राजधानी दिल्ली धुक्याच्या थराखाली असताना, शहरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली. दिल्लीप्रमाणे आता मुंबईतील हवा प्रदूषित झाल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदूषणाचे स्रोत शोधण्याची गरज आहे. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Maharashtra govt silent on Mumbai pollution. The source of pollution must be traced and proper steps need to be taken, but Shinde govt is least bothered: Aaditya Thackeray, Uddhav-Shiv Sena leader pic.twitter.com/OGjLvNK9TQ
— ANI (@ANI) December 11, 2022
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाबाबत ते म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, ते तिथेच सोडवायला हवे. हिंसा होऊ नये. ‘असंविधानिक’ शिंदे सरकार भूमिका घेऊ शकत नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही भाजपशासित राज्ये आहेत. केंद्राने हस्तक्षेप करावा असही ते म्हणाले.