Ahilyanagar News: नुकसानग्रस्तांशी केंद्रीय समितीचा संवाद, पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना दिली भेट
अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, घरे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने आज (दि. ५) पाथर्डी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन झालेल्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
या पथकाचे नेतृत्व भारत सरकारचे सहसचिव आर. के. पांडे यांनी केले. त्यांच्या सोबत कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. अरविंद वाघमारे, गृह मंत्रालयाचे अधिकारी आशिष गौर तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी अधिकारी उपस्थित होते.
पथकाने पाथर्डी तालुक्यातील करंजी, देवराई, पारेवाडी आणि सोमठाणे खुर्द या गावांना भेट दिली.
करंजी येथे राष्ट्रीय महामार्गावरील नुकसानग्रस्त पुलाची पाहणी करण्यात आली. पावसाचे पाणी घरात घुसल्यामुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थ राजेंद्र पारेकर यांची भेट घेऊन पथकाने परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?
देवराई येथील बंधाऱ्यांचे, तर पारेवाडी येथील पावसामुळे पूर्णतः क्षतिग्रस्त झालेल्या पुलाचे तांत्रिक निरीक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व नुकसानग्रस्त पुलांचा आणि बंधाऱ्यांचा सविस्तर अहवाल घेत पथकाने गरजेनुसार पुनर्बांधणी व तपासणी मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.
सोमठाणे खुर्द परिसरात शेतकरी मोहन शिदोरे यांच्या शेतातील तूर आणि बाजरी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.
शेतकरी बबनराव दानवे यांच्या संत्रा बागेची आणि पावसाने वाहून गेलेल्या जमिनीचीही पाहणी करण्यात आली. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तीजनक परिस्थिती टाळण्यासाठी कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना पथकाने संबंधित विभागांना दिल्या.
अभिजीत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद, भविष्यातही त्यांना…; प्रवीण दरेकरांनी केले कौतुक
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि विविध विभाग प्रमुखांनी पॉवर पॉइंट सादरीकरणाद्वारे केंद्रीय पथकासमोर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सर्वसमावेशक अहवाल मांडला. यात खालील बाबींचा समावेश होता:
Ans: अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती, घरे, रस्ते, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पथकाने जिल्ह्याला भेट दिली.
Ans: करंजी, देवराई, पारेवाडी आणि सोमठाणे खुर्द या गावांना भेट देऊन शेतजमीन, पूल, बंधारे व घरांच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली.
Ans: केंद्रीय पथकाच्या अहवालावर आधारित मदत निधी, पुनर्बांधणी, दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.






