कॉंंग्रेसच्या कालच्या राड्यावरून अजित पवारांचा हल्लाबोल
विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून कॉंंग्रेसकडून मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेश लाटकर यांना उमदेवारी दिल्यामुळे लाटकर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र ऐनवेळी मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कॉंग्रेसचे नेते चांगलेच संतापले होते. माध्यमांसोरही त्यांना राग व्यक्त केला होता. त्यावर आज अजित पवारांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसला दिला. आज कोल्हापूरमध्ये महायुतीची सभा पार पडली. यासभेत ते बोलत होते.
हेही वाचा-Jharkhand Election 2024: अशा पद्धतीने होणार झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका; वाचा सविस्तर
विधानसभेच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी कोल्हापूरच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी ऐनवेळी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात राजू लाटकर यांचे नाव जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अवघ्या 24 तासांत काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांचं नाव जाहीर केलं. त्यामुळे नाराज राजू लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. दरम्यान मधुरिमाराजे यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेस आणि सतेज पाटील यांची मोठी गोची झाली.
अर्ज माघार घेताना सतेज पाटीलही उपस्थित होते. त्यांनी शाहू मराजांसमोर उघड उघड नाराजी व्यक्त केली. मला तोंडघशी पाडायंच होतं तर निवडणुकीला उभं का राहिलं, माझी फसवणूक केली तुम्ही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर माध्यमांसोर दम नव्हता तर उभं का राहिला तेव्हाच का नाही सांगितल. मी पण माझी ताकद काय आहे ती दाखवली असती, असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला होता.
त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातून आणि राज्यभरातून टीकेचे झोड उठली होती. सतेज पाटील यांनी सारवासारव करत माफी मागितली. त्याच रात्री झालेल्या मेळाव्यात त्यांनी अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान आज महायुतीची कोल्हापुरात प्रचार सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी सतेज पाटील यांचं नाव न घेता टीका केली. कोल्हापूरची गादी असेल किंवा सातारची गादी. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात छत्रपतींच्या गादीबद्दल आदर आहे. त्यामुळे त्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, त्यामुळे छत्रपतींच्या गादीचा अपमान कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी आज दिला.
सुरतेत महाराजांचे मंदिर बांधणार असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र २२ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी सूरतेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला आहे. ठाकरे म्हणतात सगळीकडे छत्रपती शिवरायांचे मंदिरं उभारणार. मग सर्वात आधी मंदिर मुंब्रा येथे उभारू, आम्ही सर्व तुमच्या मदतीला येतो. महाविकास आघाडीकडे बोलायला काही नाही. गेल्या अडीच वर्षांत राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे काम केले आहे, त्याचे हे उत्तर देऊ शकत नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.