Photo Credit- Social Media (भाजपने नवाब मलिकांवर केलेल्या आरोपांवर अजित पवारांचे सूचक विधान)
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अवघ्या १२ दिवसांत महाराष्ट्रात निवडणुका होत आहे. राजकीय वातावरणही तापलं आहे. त्यात महायुतीतही राजकीय चढाओढ सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी दिल्यापासून महायुतीत धुसफूस अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. भाजपचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिली. त्यानंतरही आपला आणि दाऊदचा काही संबंध नाही. आपल्याला अडकवण्यात आले असा दावा करत नवाब मलिकांनी भाजपवर यापूर्वी गंभीर आरोपही केले होते. अशातच नवाब मलिका यांच्यांवर भाजपकडून करण्यात आलेल्या आरोपांवर खुद्द अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी नवाब मलिकांवर झालेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे. “जसं आजपर्यंत अनेक नेत्यांवर आरोप झाले तसेच नवाब मलिकांवरदेखील झाले. पण आजवर ते सिद्ध झालेले नाहीत. नवाब मलिक यांना शिक्षाही झाली होती. देश स्वतंत्र झाल्यावरही अनेक नेत्यांवर आरोप झाले, ज्यांच्या विरोधात आरोप सिद्ध झाले ते राजकारणातून बाजूला झाले. पण ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत असे नेते आज मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले. वेगवेगळ्या पदांवर पोहचल्याचं आपण अनेकदा पाहिल आहे.
हेही वाचा: Eknath Shinde : ‘उद्धव ठाकरेंची मशाल घराघरात आग लावणारी’; धाराशिवच्या सभेत एकनाथ शिंदेंचा घणाघात
गेल्या 35 वर्षांपासून मी नवाब मलिक यांना ओळखतो. ते कधीच दाऊदला साथ देणार नाहीत. याआधी काही सेलिब्रिटींवरही दाऊदची साथ दिल्याचा आरोपे झाला होता. ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले ते तुरुंगात गेले, पण ज्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत त्यांना दोषी ठरवणं योग्य नाही. नवाब मलिक हे आमचे उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांचा प्रचार करणारच. मानखुर्द शिवाजीनगरमध्ये शिंदे गटाचा उमेदवार आहे. महायुतीत अशा पाच जागांवर असं झालं आहे. तर महाविकास आघाडीतही अशाच गोष्टी घडल्या आहेत.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांवर जमीन घोटाळ्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान याच्यामार्फत एका कंपनीकडून कोट्यवधींची जमीन केवळ 30 लाख रुपयांना विकत घेतली, असा आरोप फडणवीसांनी केला होता. नवाब मलिकांनी एसबीएस रोडवर एक जागा विकत घेतली होती. एकदा आर. आर. पाटील एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत त्यांचा मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. पण सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता हे आर. आर. पाटील यांना माहिती नव्हते. याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली. सलीम पटेल हसीना पारकरचा ड्रायव्हर होता.त्याच्या नावावर पॉवर ऑफ अॅटर्नी करण्यात आली होती. असा आरोप फडणवीसांनी केला होता. या प्रकरणात नवाब मलिकांना तुरुंगातही जावे लागले.
हेही वाचा: Electric Car चार्ज करताना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, टळेल धोका