लालबागचा राजाच्या दर्शनासाठी आलेल्या ८४ वर्षीय आजीला फुटला घाम अन्...
राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष दिसून येत आहे. अशातच पुणे, मुंबई या ठिकाणी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण लोक येत असतात. बाप्पाच्या दर्शनासाठी सर्वत्र गर्दी होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा याच्या दर्शनासाठी कानाकोपऱ्यातून भाविक दाखल होत आहे. अशातच दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. याचदरम्यान लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बेळगाववरून आलेल्या ८४ वर्षीय नलिनी पाटील या मुख दर्शन रांगेत उभ्या होत्या. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ डॉक्टरांना पाचारण केले. रक्तदाबाचा त्रास झाल्याचे निदान होताच तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मंडळाच्या या तत्पर भूमिकेमुळे इतर भाविकांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दर्शनासाठी आलेल्या या मोठ्या गर्दीत या तरुणीवर तात्काळ उपचार करण्यात आले. वेळेवर उपचार मिळाल्याने तरुणी शुद्धीत आली. आता तिची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. गणेशोत्सवाचा आज सातवा दिवस आहे. लालबागचा राजा मंडप परिसरातील गर्दी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गर्दी इतकी प्रचंड आहे. भाविकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
दरवर्षी लाखो भाविक लालबागच्या दर्शनासाठी येतात आणि दोन दिवस रांगेत उभे असतात. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अचानक मुंबईतील लालबागचा राजा येथे चेंगराचेंगरीसारखी स्थिती पाहायला मिळाली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठी गर्दी जमलेली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गडबड झाली; ज्यामध्ये गर्दी, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी दिसून येत आहे. त्या गर्दीमध्ये महिला आणि लहान मुलेदेखील दिसत आहेत. व्हिडीओ पाहूनच अंगावर काटा येतो. त्यामध्ये दिसतेय की, विशेष म्हणजे पोलीस असूनही भाविक कोणतीही शिस्त पाळताना या ठिकाणी दिसत नाहीयेत. एका गेटमधून पोलीस अडवत असतानाही भाविक धक्का मारून गेट खोलून आतमध्ये येत आहेत. यावेळी महिला, पुरुष, तरुण सगळेच गेटमधून आत येण्यासाठी तुटून पडले आहेत. तुम्हीही मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असाल, तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?