मुंबई : मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer sucide) वाढल्या आहेत, तसेच कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान आता आणखी एका शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पावसाळी अधिवेशन (Mansoon session) सुरू असताना मंत्रालयासमोर (Mantralay) एका शेतकऱ्याने आत्महदहनाचा प्रयत्न (Sucide attempt) केला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. जखमी अवस्थेत या शेतकऱ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, (for treatment hospital admit) मात्र आज उपचारादरम्यान, या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
[read_also content=”मूर्ती विसर्जनबाबत पालिकेनं मुंबईकरांना केलं ‘हे’ आवाहन https://www.navarashtra.com/latest-news/ganpati-murthi-visarjan-big-decesion-by-municipal-corporation-320583.html”]
दरम्यान, मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव सुभाष भानुदास देशमुख (Shubhash Deshmukh) असं आहे. सुभाष देशमुख हे उस्मानाबाद (Osamanabad) जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील (Washim) तांदूळवाडी गावचे रहिवासी होते. 23 ऑगस्ट रोजी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी तिथे तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेतली आणि त्यांच्या हातातून पेट्रोलची बाटली हिसकावून घेतली. या घटनेमध्ये देशमुख हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे.जे. रूग्णालय येथे उपचार सुरू होते. आज 29 ऑगस्ट रोजी उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.






