As Soon As Lalit Patil Was Arrested Many Shocking Revelations Were Made What Did Lalit Say Know Nrdm
ललित पाटीलला अटक होताच केले अनेक धक्कादायक खुलासे; काय म्हणाला ललित ? : जाणून घ्या
ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे, ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. ललित पाटील याने पोलीस चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याला पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्याचा ताबा सध्या पोलिसांकडे आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहितीसमोर येत आहे. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होत आहेत. ललित पाटील याने पोलीस चौकशीत आणखी एक मोठा खुलासा केला आहे.
२०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचं उत्पादन सुरू होतं. दर महिन्याला या ठिकाणाहून ५० किलो एमडीची निर्मिती केली जात होती. या एमडीचा सप्लाय मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये केला जात होता, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे.
ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा होत होता. यातून ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील दर महिन्याला तब्बल ५० लाख रुपयांचा नफा कमावत होते, असं पोलीस चौकशीत समोर आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात १६ आरोपींना अटक केली आहे. आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत.
ललित पाटील याच पैशाच्या जोरावर हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत असल्याचं त्याच्या चौकशीतून उघड झालं आहे. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. ललित पाटील ससून रुग्णालयातून ड्रग्ज सिंडिकेट चालवत होता आणि ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घ्यायचा, अशी माहितीही ललितने पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Web Title: As soon as lalit patil was arrested many shocking revelations were made what did lalit say know nrdm