जागर यात्रा : येत्या २७ तारखेपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागर यात्रेला सुरुवात होणार आहे. आज यात्रेसंदर्भात चर्चा करायला कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलून सूचना घेण्यात आल्या आहेत. याच संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, २७ ऑगस्ट पासून आमची यात्रा सुरु होणार आहे. त्यामुळेच आज राज ठाकरे यांनी कोकणामधील पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले होते. यामध्ये रायगड, ठाणे, रत्नागिरी त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते यांची आज बैठक पार पडली आहे.
पुढे अविनाश जाधव म्हणाले की, कशाप्रकारे आपण पुढे गेले पाहिजे. या बाबतीत राज ठाकरे यांनी सर्व कोकणामधील पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेतल्या आहेत आणि या सूचनेनुसार कार्यक्रम बनवण्याचे काम सुरु आहे. २७ तारखेला कोकणामधील रस्ता पूर्ण व्हावा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला रस्त्यावर उतरलेली दिसेल. जे काही सहा ते नऊ टप्पे आखण्यात आले आहेत आणि ते कशाप्रकारे पुढे जातील याचबाबतीत आमच्या नेत्यांची बैठक आहे आणि मग राज ठाकरे यांना नंतर तो मेसेज दिला जाईल असे अविनाश जाधव म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, आमचा प्रयत्न नेहमीच असतो की एखादी गोष्ट ज्या वेळेला चांगली करतो आणि जनतेच्या हिताची करतो तेव्हा त्याचा शेवट हा सन्मानीय राज ठाकरे साहेबानी केला पाहिजे अशी मागणी देखील आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राज साहेबांकडे केलेली आहे. यांच्या बाबतीतलं शेवटचं जे कौल आहे ते राज ठाकरे साहेबाचं घेतील असे अविनाश जाधव म्हणाले. त्याचबरोबर याच मनसेच्या यात्रेचा अंतिम आराखडा उद्यापर्यत जाहीर होणार आहे. उद्या मनसे नेता बाळा नांदगावकर पत्रकार परिषद घेऊन आराखडा करणार जाहीर करणार आहेत.