मुंबई : शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रोपदाची शपथ घेणारे संजय राठोड यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर आळवला आहे. चित्रा वाघ यांनी सदर प्रकरणी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा अन्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आले. यावरून चित्रा वाघ यांनी आमचा लढा सुरूच राहील असे सांगत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राठोड यांनीही पोलिसांनी मला क्लीन चिट दिली असून यापुढे बदनामी सहन केयी जाणार नाही. पुन्हा असा प्रयत्न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ आता चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे.
बंजारा समाजाचे महंत यांनी संजय राठोड यांच्यावर केली जाणारी टीका ही देशातील संपूर्ण बंजारा समाजावर केली जाणारी टीका आहे. चित्रा वाघ यांनी सदर प्रकरणी नमती भूमिका घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. तसेच, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे.