बावडा : राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीचे बिगुल वाजले. विशेष ग्रामसभेमध्ये सदस्य आरक्षणाची सोडत गोंधळातच पार पडली. बावड्याचे मंडळ अधिकारी मल्लाप्पा ढाणे, कामगार तलाठी अमोल हजगुडे, ग्राम विकास अधिकारी अंबिका पावसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत पार पडली. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याच्या हातून चिठ्ठ्या काढून पार सोडत काढण्यात आली. मात्र काही ठिकाणी आरक्षणामुळे गोंधळ निर्माण झाला होता. या विशेष ग्रामसभेत सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, माजी सभापती प्रशांत पाटील, उदयसिंह पाटील, महादेव रावजी घाडगे, विजय गायकवाड, शेतकरी संघटनेचे नेते, दलित पॅंथर जिल्हाध्यक्ष लहुजी आणा गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच पदासाठी निवडणूक
सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी महिलेसाठी इंदापूर पंचायत समितीच्या झालेल्या सोडतीमध्ये यापूर्वीच जाहीर झाले आहे. सरपंच पदाची निवडणूक थेट होत असून सदस्य पदाच्या सतरा जागेसाठी सहा प्रभागातून झालेली सोडत आरक्षण सोडत पुढील प्रमाणे; प्रभाग क्र १ अनु – जाती – महिला, ना.मा.प्र.- पुरुष, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र २) ना.मा.प्र – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र ३ अनु – जाती पुरुष, सर्वसाधारण – महिला, प्रभाग क्र ४ अनु – जाती – महिला, ना.मा.प्र – महिला, सर्वसाधारण महिला/पुरुष, प्रभाग क्र ५ अनु – जाती – पुरुष, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला/पुरुष, प्रभाग क्र ६ सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण – पुरुष.