कल्याण : शेतीच्या वादातून एका गटाकडून दुसऱ्या शेतकरी कुटुंबांला बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेला वयोवृद्ध शेतकरी २० दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. चांगदेव बनकरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. चांगदेव यांची पत्नी देखील गंभीर अवस्थेत आहे. या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. अन्य सहा जणांना टिटवाळा पोलिसांनी अटक करावी अशी मागणी मयत झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी केली आहे.
कल्याण तालुक्यातील रुंदी आंबिवली हे गाव आहे. या गावात चांगदेव बनकरे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांची दोन मुले दुग्ध व्यवसाय आणि शेती करतात. यावर त्याचा उदर निर्वाह सुरु होता. ५ एप्रिल रोजी चांगदेव यांची पत्नी उषाबाई बनकरे शेतात असताना त्यांचे नातेवाईक बाळाराम टोके यांनी सांगितले की, आमच्या शेतीत तू काय करते तू इथून निघून जा. उषाबाई हिने घडला प्रकार तिच्या मुलांसह पतिला सांगितला. चांगदेव आणि त्यांचे कुटुंबिय बाळारामला जाब विचारण्यासाठी गेले. बाळाराम याने सांगितले की, ही शेती आमची आहे. त्यावर तू मालकी हक्क कसा काय दाखवू शकतो. यावरुन चांगदेव आणि बाळाराम यांचा वाद झाला. या वादात बाळाराम टोके त्यांची मुले इतर सहा ते सात जणांनी बनकरे कुटुंबियांना दांडके आणि रॉडने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाण चांगदेव बनकरे त्यांची पत्नी उषाबाई आणि दोन मुले तसेच चुलता हे जखमी झाले. चांगदेव यांना गंभीर अवस्थेत टिटवाळा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात टिटवाळा पोलिसांनी आधी दोन जणांना अटक केली होती.
मात्र चांगदेव बनकरे यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. चांगदेवच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुुटुंबियांनी आधी त्यांचा मृतदेह घेण्यास नकार दिला. या प्रकरणात नऊ आरोपी होते. सर्व आरोपींना पोलीस जोपर्यंत अटक करीत नाही. तोपर्यंत चांगदेव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलिसांनी समजूत काढली. या प्रकरणात सागर टोके, अमित टोके आणि प्रल्हाद टोके यांना अटक केली आहे. अन्य सहा आरोपींना अटकेचे आश्वासन पोलिसांनी दिल्यावर चांगदेव कुटुंबियांना मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.