Photo Credit- Social Media शेतकरी तरूणांची इच्छा फडणवीस पूर्ण करणार का
भंडारा: गल्लीपासून दिल्लीपर्यंत शेतकऱ्यामंध्ये असंतोषाची भावना उसळत आहे. दिल्लीतील संभू सीमेवर शेतकरी आपापल्या मागण्यासांठी आंदोलन करत आहेत. तर महाराष्ट्रातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. पण शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. अशातच भंडाऱ्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी एक अभिनव आंदोलन करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘एकतर शेतीमालाला योग्य भाव द्या नाहीतर लग्नासाठी तुम्हीच मुलगी शोधून द्या,” अशी साद या तरूणांनी घातली आहे.
सुरेश धसांना ‘ते’ वक्तव्य भोवणार? प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाकडून दखल
भंडाऱ्यातील तरूणांनी, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, अन्यथा लग्नासाठी तुम्हीचं मुली शोधून द्या, असे मजकूर असलेले बॅनर्स हातात आशयाचे बॅनर हातात घेऊन आंदोलन केले आहे. आता या आंदोलनाची भंडाऱ्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दिवाळीनंतर राज्यभरात लग्नसराईला जोरदार सुरूवात झाली आहे. पण शेतकऱ्याकडे पाच-दहा एक शेती असूनही लग्नासाठी मुलगी द्यायला काय दाखवायला पण कोणीही तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही, अशी खंत या तरूणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, “एक तर आमच्या शेती मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या. ज्या दिवशी आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील. शेतकऱ्याला शेती परवडते हे प्रत्येक मुलीच्या बापाला वाटले पाहिजे. तेव्हाच ते आपल्या मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाला देतील, असे तरुणांनी म्हटले आहे.
रेल्वेत नोकरीच्या आमिषाने लष्करातील निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; तब्बल 17 लाखांची फसवणूक
शेतकरी आंदोलक तरूण जयपाल भांडारकर ने नवरदेवाप्रमाणे डोक्यात टोपी आणि बाशिंग बांधून देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केलं आहे. ” एक तर आम्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या,शेतमालाला भाव मिळाला तरच आमचे प्रश्न सुटणार आहेत. असंही त्याने म्हटलं आहे.
जयपाल भंडारकरने आपल्या फेसबुकवरून व्हिडीओ शेअर केला आहे. “आज हे सत्य परिस्थिती आहे मित्रांनो
शेतकऱ्याच्या मुलाला कुणी लग्ना साठी मुलगी दयायला तयार नाही.. माझ्या मित्रानी सहज मला कॉल केला तेव्हा त्यांनी त्यांची परिस्थिती सांगितली आणि मागच्या महिन्यात एका शेतकऱ्याच्या मुलांना आत्महत्या केली त्याच कारण काय तर लग्नासाठी मुलगी मिळत नाही.. कारण जर आपल्या मालाला भाव मिळालान आपले सगळे प्रश्न सुटतील.”