फोटो सौजन्य- प्रतिनिधी
कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या आशेळे माणेरे गावांत तब्बल 1 कोटी 30 लाखांच्या विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज सुलभा गायकवाड यांच्याहस्ते पार पडला.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असून आचारसंहितेच्या आधी मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटने करण्याची लगबग लोकप्रतिनिधींची दिसून येत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात देखील आमदार गणपत गायकवाड यांच्या माध्यमातून कित्येक कोटींची विकासकामे मंजूर करण्यात आली असून टप्या टप्याने त्यांचे भूमिपूजन, उद्घाटन करण्यात येत आहे.
गावातील विविध विकासकामे
आज देखील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील आशेळे, माणेरे या गावांतील विविध विकासकामांचे सुलभा गायकवाड यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कामांसाठी तब्बल 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रभाग क्र.१०५ मधील दिपक कडु चाळ आशेळे प्रवेश द्वार पर्यंत रस्ता तयार करणे. प्रभाग क्र.११८ आशेळे गाव मधील मातोश्री बंगल्या समोर आर.सी.सी. गटार बनवणे. आशेळे गाव मधील जानुनगर परिसरात बंधिस्त गटार व पायवाट बनवणे. आशेळे गावांतील सेंटपॉल हायस्कुल जवळचा रस्ता तयार करणे. कृष्णानगर मधील साई कृपा अपार्टमेंट ते दर्शन निवास पर्यंत आर.सी.सी. रस्ता बनवणे. माणेरे गावांतील लालचंद्र जोशी यांच्या घरापासून ते गोपीनाथ जोशी यांच्या घरापर्यंत आर.सी.सी. रस्ता बनवणे या कामांचा समावेश आहे.
आमदार गणपत गायकवाड यांनी माणेरे आशेळे गावाला जे रस्त्यांचे वचन दिले होते ते आज पूर्ण केले असून यापुढे देखील नगरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.