सैन्यामध्ये पदोन्नतीनंतर जवानांचा सन्मान करताना ज्या पद्धतीने औपचारिक समारंभ केला जातो, तशीच प्रथा आता मुंबई पोलीस दलात सुरू होणार आहे. मुंबई पोलीस दलातील पदोन्नती मिळालेल्या अधिकारी अमलदारांचा पिपिंग सेरेमनी म्हणजेच बँड पथकाच्या संचालनाद्वारे सन्मान करा असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त देवेन भरती यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला आहे. या सेरेमनीमध्ये संबंधित अधिकाऱ्याला किंवा अंमलदाराला औपचारिक पद्धतीने नवीन रँकची बॅजेस (पिप्स) लावण्यात येतात आणि बँड पथकाच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान केला जातो.
Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना
पदोन्नती म्हणजे केवळ नवा दर्जा किंवा हुद्दा मिळवणे नसून, त्यामागे त्या कर्मचाऱ्याचे वर्षानुवर्षांचे कर्तव्य, निष्ठा आणि समर्पण असते. पदोन्नती म्हणजे कर्तव्यादरम्यान पार पाडलेली जबाबदारी, कर्तृत्व व समर्पणाला मिळालेली मान्यता असते, असे ही त्यात नमूद केले आहे. त्यामुळे पदोन्नती हा निव्वळ प्रशासकीय सोपस्कार न राहता प्रेरणास्रोत व्हावा, हा उद्देश असल्याचेही देवेन भारती यांनी पत्रात म्हटले आहे.
पदोन्नतीचे आदेश जाहीर झाल्यानंतर त्याच महिन्याच्या पहिल्या तारखेला हा सन्मान समारंभ पार पाडाव असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिस दलात अनेक वर्षांपासून पदोन्नती केवळ कागदोपत्री औपचारिकता होती. मात्र आता हा निर्णय अधिक प्रेरणादायी आणि गौरवपूर्ण ठरेल, असे सांगण्यात आले आहे.
पोलीस दलामधून सकारात्मक प्रतिसाद
या नव्या उपक्रमामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि अभिमानाची भावना निर्माण होईल, असे मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई पोलीस दलात अधिक निष्ठावान आणि प्रेरित कार्यसंस्कृती तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलिस आयुक्त हे पदोन्नतीप्राप्त अंमलदारांचा तर पोलिस सहआयुक्त हे उपनिरीक्षक ते सहायक आयुक्तपर्यंत दर्जाच्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतील. यात अंमलदार असो वा अधिकारी पदोन्नती मिळाल्यावर त्यांचे मनोबल वाढावे, केवळ प्रशासकीय बाब नाही तर काम करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा निर्णय महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Pune News : कोंढव्यात भरदिवसा घरफोडी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास