119 गावांमध्ये तीव्र जलसंकट; 5.85 लाख जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर
बुलढाणा : जिल्ह्यात आतापर्यंत 119 गावांमध्ये जलसंकट असले तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. जलप्रकल्पातील साठाही 14 टक्क्यांपर्यंत आला आहे. पिण्याच्या पाणी संकटासाठी विविध उपाययोजना होत असली तरी चाराटंचाई जाणवणार नसल्याचा विश्वास प्रशासनाला आहे. परंतु, जनावरांना पिण्याच्या पाण्याचा फटका बसणार असल्याची शक्यता वाटत आहे. जिल्ह्यात 5 लाख 95 हजार 676 पशुधन 2019 च्या पशुगणनेनुसार आहे. तर सध्या पशुगणना झाली असली तरी केंद्र शासनाच्या एका पत्रानुसार पशुगणना घोषित करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
गतवर्षीच्या समाधानकारक पावसामुळे जलप्रकल्प 100 टक्के भरले होते. मात्र, यंदा मार्चपासूनच पारा वाढू लागला अन् पाण्याची टंचाईही जाणवू लागली सुरुवातील 5 गावात पाणीटंचाई जाणवू लागली असताना घाटावर 245 गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आली आहे. आतातर 119 गावांमध्ये टंचाई असून, 133 खासगी पाणीटंचाई विहिरी अधिग्रहीत करण्यात आली आहे. पाणीटंचाई सध्या घाटावरील 5 तालुक्यात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने टँकर सुरू करताना गावांची लोकसंख्या सोबतच पशुधनाचाही उल्लेख करण्यात येत आहे आहे. त्यामुळे पशुधनाचीही व्यवस्थाही जिल्हा प्रशासनाने केल्याचे दिसून येत असले तरी पशुधनाची व्यवस्था करण्यासाठी पशुपालकच धावत आहेत.
आगामी काळात पाऊस न पडल्यास ही अवस्था बिकट होऊन पशुविक्री करण्याची वेळ पशुपालकांवर येऊ शकते. लहान पशुधनाला प्रति किलो 3 तर मोठे पशुधनाला प्रति 6 किलो खाद्य लागते. मोठ्या पशुधनाला 27 लाख 3 हजार 282, तर लहान पशुधनाला 4 लाख 35 हजार 870 मेट्रिक खाद्य दरमहा लागणार असून, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
अद्याप चाराटंचाईची कोणतेही प्रकरण पशुसंवर्धन खात्याकडे आलेले नाही. त्यामुळे चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाही. चाऱ्याची व्यवस्था शेतकरी व पशुपालकांनी करून ठेवली आहे. मात्र, जनावरांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. माणसांपेक्षा जनावरांना अधिक पाणी लागत असते. पाणीटंचाई वाढल्यास त्याचा फटका जनावरांना बसू शकतो.
– अमित दुबे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन बुलढाणा