संभाजीनगरमध्ये मंदिरासमोरच भीषण अपघात; कारने सहा जणांना चिरडले(संग्रहित फोटो)
इगतपुरी : नुकत्याच उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नाशिकमधील व्यावसायिक सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या अपघाताबाबत कुटुंबीयांनी आरोप केला की, वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला.
सुनील आपल्या कुटुंबासह मुंबईहून नाशिकला कारने जात होते. इगतपुरी बोगद्यानंतर शहापूर सीमेवर त्यांच्या कारला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, कार तीन वेळा उलटली आणि सुनील कारमधून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, गेल्या आठवड्यात कसारा-शाहपूर तहसीलमधील वाशिंद पोलिस स्टेशन परिसरातील समृद्धी महामार्गावर क्रूझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. तर सात जण जखमी झाले होते. एका वेगवान कूझर वाहनाचे नियंत्रण सुटून ते कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला. अपघातांची ही सतत वाढत असलेली मालिका पाहता, समृद्धी महामार्गाच्या सुरक्षिततेवर आणि व्यवस्थापनावर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
नागपुरात अपघात
दुसऱ्या एका घटनेत, आयुध निर्माणी अंबाझरीच्या सेल मशीन विभागात कार्यरत तिघा कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला सोमवारी (दि.23) सकाळी भरत नगर वळणावर मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत.