संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल (फोटो- ट्विटर)
मुंबई: यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अत्यंत महत्वकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रूपये दिले जाणार आहेत. दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र महाविकास आघाडी या योजनेवरून सरकारवर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. मात्र आता या योजनेवरील टीकेमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. कारण राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाडकी बहीण योजेनबद्दल खोटी माहिती पसरविल्याबद्दल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध मध्य प्रदेशमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली असल्याचा खोटा दावा राऊत यांनी केल्याप्रकरणी भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोपाळमध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या तक्रारीवरुन संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भोपाळमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना बंद झाल्याची खोटी अफवा पसरवली होती. ज्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणसाठी सुरू करण्यात आली आहे. भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाष चौहान यांच्या तक्रारीनंतर संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत भाजप सरकार लाडक्या बहिणीस दर महिन्यास १,२५० रूपये देत आहे. दरम्यान त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील ही योजना सुरू करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधील महिला सक्षम होण्यासाठी व त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचे म्हटले जाते. तसेच भाजपने या राज्यात लोकसभेत २८ च्या २८ जागा जिंकल्या होत्या. या योजनेमुळेच हा विजय झाला असल्याचे म्हटले जात आहे.