Cashing In Fake Rs 500 Notes At Bank Of Baroda In Amravati Nrka
अमरावतीत ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा; पोलिसांत गुन्हा दाखल
शहरांमध्येही बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी बँक ऑफ बडोदा येथे जमा केलेल्या 500 रुपयांच्या 20 नोटा बनावट असल्याचे आढळून आले आहे.
अमरावती : शहरांमध्येही बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. सराफा बाजारात व्यापाऱ्यांनी बँक ऑफ बडोदा येथे जमा केलेल्या 500 रुपयांच्या 20 नोटा बनावट असल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी बँकेचे शाखा व्यवस्थापक शशिकांत प्रेमचंद वारके यांच्या फिर्यादीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
खोलापुरीगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराफा बाजारात बँक ऑफ बडोदाची शाखा आहे. 16 एप्रिल रोजी बँकेत काही ज्वेलर्सच्या चालू खात्यात 25 हजार 500 रुपये जमा करण्यात आले. ज्यामध्ये 500 रुपयांच्या तीन नोटा बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर कांतम ज्वेलर्सच्या चालू खात्यात जमा केलेल्या 25 लाखांच्या रक्कमेपैकी 500 रुपयांच्या 14 नोटा बनावट असल्याचे आढळून आले.
तसेच सराफा बाजार येथील रावसाहेब यमगार यांच्या बचत खात्यात 5 हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यात तीन नोटा बनावट आढळून आले. अशाप्रकारे बँकेत एकूण 20 बनावट नोटा बँकेत जमा करण्यात आल्याचे आढळून आले. याप्रकरणात बँकेचे शाखा व्यवस्थापक शशिकांत प्रेमचंद वारके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 489 (ब) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Web Title: Cashing in fake rs 500 notes at bank of baroda in amravati nrka