Cdm Machine In Parli Closed For Three Months Conscious Neglect Of Bank Officials Nrdm
बीडच्या परळीत सिडीएम मशीन तीन महिन्यापासून बंदच; बँक अधिकाऱ्यांचे जाणिवपुर्वक दुर्लक्ष?
बीडच्या परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे. याकडे बँक अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. यामुळे व्यापारी व सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय होत आहे.
बीड : बीडच्या परळी शहरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेचे सिडीएम मशीन गेली तीन महिन्यापासून बंद आहे. याकडे बँक अधिकारी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. यामुळे व्यापारी व सर्वसामान्य खातेदारांची गैरसोय होत आहे. सिडीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना इतर पद्धतीने पैसे टाकावे लागत आहेत. त्या करिता अतिरिक्त शुल्क भरावा लागत आहे.
परळी शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत कॅश डिपॉझिट मशीन उपलब्ध आहे. खातेदारांना एक लाखावरील रक्कम ही बँकेत जमा करता येते मात्र एक लाखापेक्षा कमी असलेली रक्कम ही सीएसपी किंवा सिडीएम वर भरता येते. ग्राहक सेवा केंद्रावर रक्कम भरण्याची मर्यादा 20000 इतकीच आहे. खातेदाराला यापेक्षा जास्त रक्कम असल्यास ती सीडीएम मशीन मध्ये डिपॉझिट करता येते.
मात्र मुख्य शाखेत असलेली सिडीएम मशीन गेली तीन महिनाभरापासून बंदच असल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सिडीएम मशीन बंद असल्याने बँकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या सिडीएम मशीनची सेवा पूर्वीप्रमाणे सुरळीत करण्याची मागणी खातेदारांकडून होत आहे.
Web Title: Cdm machine in parli closed for three months conscious neglect of bank officials nrdm