छगन भुजबळ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहणार (फोटो -टीम नवराष्ट्र)
अहिल्यानगर: राज्यात मागीलवर्षी विधानसभा निवडणूक पार पडली. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटप देखील केले गेले. मात्र या मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे छगन भुजबळ चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान आज नाराजी नाट्यानंतर छगन भुजबळ आणि अजित पवार पहिल्यांदाच एकत्रित येणार आहेत. नेमके हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात होणार आहे. या शिबिराला सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या शिबिराला मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेले छगन भुजबळ देखील उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या शिबिराला छगन भुजबळ उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरू होती. तब्येतीच्या कारणांमुळे भुजबळ उपस्थित राहणार नाही असे समोर येत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विनंतीला माण देत अखेर छगन भुजबळ या शिबिराला उपस्थित राहणार आहेत. मंत्रीपद मिळाले नसल्याने भुजबळ चांगलेच नाराज झाले होते. या नाराजीनंतर आज या शिबिरात पहिल्यांदाच छगन भुजबळ आणि अजित पवार एकत्र येणार आहेत. त्यामुळे भुजबळ यांची नाराजी दूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: DBT scheme : मंत्री धनंजय मुंडेंचा आणखी एक घोटाळा समोर? हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब
माझा पतंग कोणी कापू शकणार नाही: छगन भुजबळ
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळात माजी मंत्री छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आले नाही. त्यावर भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले, ‘राजकारणात मी अनेक वर्षांपासून आहे. मी अनेकांचे पतंग कापले आहेत. त्यामुळे माझा पतंग कोणी कापू शकणार नाही’.
हेही वाचा: ‘राजकारणात मी अनेक वर्षांपासून, अनेकांचे पतंग कापले, पण…; छगन भुजबळ यांचं मोठं विधान
राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र, भुजबळ यांना मंत्रिपदावरून डावलण्यात आले. या नाराजीतून त्यांनी पक्षावर दबाव वाढवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्यांनी घेतली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या दबावाला बळी पडले नाहीत. पुढे भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते. आता परतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी राजकीय फटकेबाजी सुरू केली आहे. सध्या येवला या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेले भुजबळ म्हणाले की, जनतेने मला 20 वर्षे काम करण्याची संधी दिली आहे. शिवाय पुढील पाच वर्षे आमदारकी ही बहाल केली आहे. त्यामुळे मी समाधानी आहे. अशा स्थितीत माझा पतंग कोणीही कापणार नाही.