आजही हे दगडाचे मॉडेल नागपुरातल्या वस्तु संग्रहालयात ठेवलेले आहे. बीरशहाची समाधी ही सँड स्टोननं बांधली असून, चुण्याची जुळवणी आहे. एखाद्या राजाची ही महाराष्ट्रातील सर्वातमोठी समाधी आहे. त्यामुळे, या समाधीचं प्राचीन वास्तू म्हणून महत्त्व तर आहेच, शिवाय प्रेमाचं प्रतीक म्हणूनही या समाधीची विशेष ओळख आहे. व्हॅलेंटाइन डे लोकं आत्ता आत्ता साजरा करू लागले. पण यातील कितींनी आपल्या राणीसाठी किंवा राजासाठी राजमाता राणी हिराई व मुगल शासक शहाजहान सारखा संकल्प सोडला असेल…? फुल नाही तर, फुलांची पाकळीच सही….!
[read_also content=”गडचिरोली देशातील दुसरा महाकुंभ असणाऱ्या मेडाराम यात्रेसाठी तेलंगाणातून बसेस सुरु https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gadchiroli/buses-start-from-telangana-for-medaram-yatra-the-second-largest-amulet-in-the-country-nraa-237657.html”]
प्रेमवीर घेतात प्रेरणा – धीरज शेडमाके, गोंडराजे वंशज, चंद्रपूर
आज व्हॅलेंटाईन डे सर्वत्र साजरा केला जातो. प्रेमाचे प्रदर्शन केले जाते. प्रेमाच्या नावाखाली तरुणाई ब-याचदा सीमोल्लंघन करते. अशा तरुणाईला राणी हिराई आणि राजे बीरशहाच्या प्रेमाचे महत्त्व पटवून देण्याची गरज निर्माण झाली आहे. आज या समाधीला भेट देऊन अनेक विवाहित जोडपेसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली देतात. पुरातत्त्व विभागासाठी ही समाधी दुर्लक्षीत असली, तर सच्चे प्रेमवीर मात्र या समाधीपासून प्रेरणा घेतात.
व्हॅलेंटाईन डे आठवते सर्वांना प्रेमाचं हे प्रतीक – अशोकसिंह ठाकूर, इतिहास संशोधक
ज्यांना प्राचीन इतिहासाचा आणि स्थापत्य कलेचा अभ्यास करायचा आहे, असे संशोधक इथं भेट देत असतात. सध्या ही समाधी आणि हा परिसर तेवढ्यापुरताच मर्यादित झाला आहे. मुघल स्थापत्यकलेचा प्रभाव असलेली ही भव्य वास्तू उभारून राणी हिराई इतिहासात अमर झाली. सध्या ही अमर वास्तू पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं या परिसराचा विकास होऊ शकतो. पण अजूनही त्याकडे राज्यकर्त्यांचं लक्ष गेलेलं नाही. त्यामुळं हे प्रेमाचं प्रतीक केवळ व्हॅलेंटाईन डेलाच लोकांना आठवतं.