पुणे : राज्यात सध्या सुरु असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दांत आज टीका केली आहे.
इतकी सरकारं आली पण कोणाला त्रास झाला नाही. विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण मग त्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा यांना भोंग्यांचा त्रास झाला नाही. पण आपले भाऊ मुख्यमत्री झाले अन् यांना भोंग्याचा त्रास सुरु झाला. हा त्रास त्यांना पोटातून त्रास सुरु झाला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनापासून पोटदुखीपर्यंत सर्व आजारांवर उपचार करायला सक्षम आहेत. अशी टीका राज ठाकरे यांच्यावर खासदार शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना केली.
राज्यात सध्या सुरु असलेल्या भोंग्याच्या राजकारणावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कडव्या शब्दांत टीका केली आहे. गेल्या पंधरा वर्षात यांना त्रास झाला नाही पण भाऊ मुख्यमंत्री होताच त्यांना त्रास कसा सुरु झाला?असा सवाल त्यांनी केला. हडपसरमध्ये शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, लोक सध्या पेटवापेटवीची भाषा करत आहेत. कोणी करायची पेटवापेटवीची भाषा, आमचं आख्खं आयुष्य पेटवापेटवीत गेलं. सवाल ये नही की बस्तीयां क्यो जली गई, सवाल ये है की बंदर के हाथ मे माचिस किसने दिया. बरं माचिस देऊनही ते पेटायला तयार नाही. दारुगोळा शिवसेनेकडं असताना कसा काय पेटणार? पेटण्यासाठी आतून आग असावी लागते. मनगटात धग असावी लागते. पोलीस आले तेव्हा पेटवणारे पळून गेले. हा महाराष्ट्र आंड्या-पांड्यांचा नाही, लेच्यापेच्यांचा नाही. हा महाराष्ट्र शिवसेनेचा आहे. असे संजय राऊत म्हणाले.
[read_also content=”वैतरणा धरण परिसरात सापडला होता जळालेला मृतदेह, कसा झाला हत्येचा उलगडा? : जाणून घ्या सविस्तर https://www.navarashtra.com/maharashtra/burnt-body-was-found-in-vaitarna-dam-area-how-was-the-murder-solved-learn-more-nrdm-276678.html”]
भारतीय जनता पक्षा नामशेष होईल अशी चिड जनतेमध्ये आहे. आपण सगळ्यांनी अत्यंत जागरूकपणे काम करण्याची गरज असून, भाजपने अनेक महानगरपालिकांमधून प्रचंड लुटमार करण्यात आली.पुणे महापालिकाही त्यातून सुटली नसल्याचे म्हणत नागपूर महापालिकते दरोड्यांवर दरोडे पडत आहेत आणि देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढू. पण गेली पन्नास वर्षे मराठी माणसाने मुंबई महापालिकेवरील भगवा खाली उतरवला नाही यातच सर्व काही आल्याचे राऊत म्हणाले.